Sheikh Shahjahan CBI Custody : शाहजहान शेख याला बंगाल पोलिसांनी सीबीआयाकडे सोपवले !

  • बंगाल पोलिसांनी आधी दिला होता नकार !

  • कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात बंगाल सरकारची याचिका

तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहान

कोलकाता (बंगाल) – बंगालच्या संदेशखाली येथे हिंदु महिलांचे लैंगिक शोषण आणि अंमलबाजवणी संचालनालयाच्या पथकावर आक्रमण या प्रकरणी अटक करण्यात आलेला तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याला कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला होता. यासाठी न्यायालयाने ६ मार्चला दुपारी ४.१५ पर्यंतची समयमर्यादा दिली होती. त्यापूर्वी सीबीआयने बंगाल पोलिसांकडे शाहजहानची मागणी केली असता त्याला नकार दिला. तसेच बंगाल सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका प्रविष्ट केली; मात्र न्यायालयाने त्यावर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. ‘जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत नाही, तोपर्यंत आरोपीचा ताबा सीबीआयकडे देता येणार नाही’, असे बंगाल पोलिसांनी सांगितले होते; मात्र ६ मार्चला दुपारी ४.१५ पर्यंत शाहजहान शेख याला सीबीआयकडे सोपवण्यात आले नव्हते. सायंकाळी साडेसहानंतर पोलिसांनी शाहजहान याला सीबीआयच्या कह्यात दिले.

संपादकीय भूमिका

शाहजहान शेख याला सीबीआयच्या कह्यात दिल्यास तृणमूल काँग्रेसच्या सर्व घोटाळ्यांची माहिती उघड होणार असल्यानेच बंगाल सरकार त्याला सोपवण्यास नकार देत होती. यावरून तृणमूल काँग्रेसला लोकशाहीची किती चिंता आहे, हे लक्षात येते !