‘नथुराम गोडसे म. गांधींच्या हत्येच्या वेळी जरी बंदूक घेऊन असले, तरी बुलेट त्यांच्या पायाजवळ पडलेल्या आढळून आल्या होत्या. यामुळे गांधी यांच्यावर दुरून कुणी दुसर्या व्यक्तीने गोळी चालवली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याखेरीज नथुराम गोडसे यांना पुण्य कमवायचे होते; म्हणून त्यांनी गांधी हत्येचे दायित्व स्वीकारले असू शकते, तसेच गोडसे म. गांधी हत्येच्या २ दिवस आधी देहली फिरत होते, तेव्हा त्यांना कुणीच थांबवले नव्हते. फक्त राजकीय लाभ उचलण्यासाठी गांधी हत्येचा उपयोग नेहरूंनी करून घेतला.
केंद्र सरकारने अजूनही कपूर अहवाल स्वीकारला वा नाकारला नाही. त्यामुळे तो अहवाल जनतेसाठी खुला करावा. यामुळे लोकांना सत्य परिस्थिती लक्षात येईल. हा केवळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विषय नाही, तर मानवी अधिकारांचा विषय आहे.
नथुराम गोडसे फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता. त्यामुळे रा.स्व. संघ आणि हिंदु महासभा यांवर बंदी घालण्यात आली होती. ‘हे राम’ नाव घेऊन मोठे पाप दाबून ठेवण्यात आले होते. नथुराम गोडसेंच्या गोळ्यांनी गांधींचा मृत्यू झाला नाही. कर्नल तनेजा यांनी काळजीपूर्वक अहवाल बनवला आहे. नथुराम गोडसे यांचा समज झाला की, मीच गोळ्या मारल्या; पण खर्या गोळ्या इतरांनी मारल्या होत्या. तिथे २०० लोक होते. तिथे सुरक्षाव्यवस्था होती.’
(श्री. रणजित सावरकर यांनी ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी केलेल्या भाषणाचा संपादित अंश)
श्री. रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक.