नवी देहली – देहलीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी देहलीच्या सरकारी रुग्णालयांमध्ये गुणवत्ता मानक चाचण्यांमध्ये सदोष ठरलेल्या औषधांच्या पुरवठयाची सीबीआयकडून चौकशी करण्याची शिफारस केली आहे.
या संदर्भात देहलीचे आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, मी पदभार स्वीकारल्यानंतर औषधांच्या खरेदीची लेखातपासणी करण्याचे निर्देश दिले होते; मात्र आरोग्य सचिवांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. या प्रकरणी प्रशासकीय आणि इतर संबंधित अधिकार्यांचे निलंबन करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.