आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय प्रकरण ‘एन्.आय.ए.’कडे सोपवण्याची मागणी
पणजी, १६ डिसेंबर (वार्ता.) : हणजूण येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेले केनिया (आफ्रिका) येथील मानवी तस्करी प्रकरण देशभर पसरले आहे आणि त्याचे गोवा हे प्रमुख केंद्र आहे, अशी माहिती या प्रकरणाचे अन्वेषण करणारे अंमलबजावणी संचालनालय (ई.डी.) आणि गोवा पोलीस यांना मिळाली आहे. या प्रकरणातून सुटका करण्यात आलेल्या केनियाच्या अन्य २ युवतींनीही गोवा हे प्रमुख स्थान असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
— Arun Pandey (@arunpandeygoa) December 16, 2023
गोवा पोलिसांच्या मानवी तस्करीविरोधी विभागाने नियुक्त केलेली अशासकीय संस्था ‘अन्याय रहित जिंदगी’ या संस्थेचे संस्थापक अरुण पांडे म्हणाले, ‘‘केनिया मानवी तस्करी प्रकरण पुढील अन्वेषणासाठी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (‘एन्.आय.ए.’कडे) सुपुर्द केले पाहिजे. या प्रकरणी आतापर्यंत हणजूण येथील ८ युवतींची सुटका करण्यात आली आहे आणि ही संख्या एकूण प्रकरणाच्या तुलनेत अल्प आहे. या ठिकाणी आफ्रिका येथील युवतींना आणून वेश्याव्यवसायात ढकलले जात होते आणि या युवतींना देशातील विविध शहरांमध्ये पाठवून तेथे त्यांचे लैंगिक शोषण केले जात होते. या मानवी तस्करीच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले कोट्यवधी रुपये हवालामार्गे (‘हवाला’ म्हणजे अरबी आणि दक्षिण आशिया येथील देश पैशांचे हस्तांतर करण्यासाठी वापरत असलेली एक विशिष्ट प्रणाली) पाठवले जात होते. ‘एन्.आय.ए.’कडे मानवी तस्करीचे अन्वेषण करण्यासाठी विशेष विभाग असून या माध्यमातून देशविदेशात गुंतलेल्यांना कह्यात घेणे शक्य होणार आहे.’’
— Arun Pandey (@arunpandeygoa) December 16, 2023
गोवा पोलिसांनी मागील सप्टेंबर मासात हे प्रकरण उघडकीस आणले होते. या वेळी हणजूण पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशाल देसाई म्हणाले होते की, या वेश्याव्यवसायात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘मसाज रिपब्लीक’ या नावाने एक संकेतस्थळ चालवले जात होते. ग्राहक आणि मानवी तस्करी करणारे यांच्यामध्ये व्यवहार पक्का झाल्यानंतर पीडित युवतीला प्रथम एक ‘क्यु.आर्. कोड’ (बारकोडप्रमाणे असलेली एक प्रकारची सांकेतिक भाषा) ग्राहकाला देणे भाग पडत होते. ग्राहकाने या ‘क्यु.आर्. कोड’च्या माध्यमातून पैसे दिल्यावर ते मानवी तस्करी चालवणार्यांच्या अधिकोषात जमा होत होते.’’
संपादकीय भूमिका
|