सर्वोच्च न्यायालयाची पतंजलीला चेतावणी !
नवी देहली – दिशाभूल करणारी विज्ञापने तातडीने थांबवली पाहिजेत अन्यथा न्यायालयाला याची गंभीर नोंद घ्यावी लागेल आणि प्रत्येक उत्पादनामागे १ कोटी रुपयांचा दंड ठोठवावा लागेल, अशी चेतावणी सर्वोच्च न्यायालयाने योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजलि आयुर्वेद आस्थापनाला दिली. पतंजलीच्या विज्ञापनांच्या विरोधात भारतीय वैद्यकीय संघटनेने (‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने) प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वरील चेतावणी दिली. ‘या वादाला आम्ही ‘अॅलोपथी विरुद्ध आयुर्वेद’ असे स्वरूप देऊ इच्छित नाही. आम्हाला फसव्या विज्ञापनांच्या समस्येवर उत्तर शोधायचे आहे,’ असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.
या याचिकेवर गेल्या वर्षी झालेल्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीसह केंद्रशासनाचे आरोग्य मंत्रालय, तसेच आयुष मंत्रालय यांनाही नोटीस बजावली होती.
संपादकीय भूमिका
|