एखाद्या व्यक्तीच्या गुणांबद्दल काही लिहायचे असले, तर तिच्यात असलेले गुण इतरांच्यातही असल्याचे जाणवल्यास त्या दुसर्या व्यक्तीबद्दल पूर्वी लिहिलेल्या माहितीप्रमाणे लिखाण करता येते. सौ. बिंदाताई (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ) इतक्या अद्वितीय आहेत की, त्यांच्याबद्दल लिहितांना दुसर्या लेखांतील लिखाणाप्रमाणे लिखाण करता येत नाही. एवढेच नव्हे, तर त्यांच्यात एवढे अद्वितीय गुण आहेत की, तेही भाषेच्या पलीकडचे असल्याने लिहिता येत नाहीत.
अलौकिक, शब्दातीत, असे अनेक गुण त्यांच्यात असल्यामुळे त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, जसे ईश्वराचे अनेक गुण वर्णनातीत आहेत, तसे सौ. बिंदाताईंमध्ये वर्णनातीत अनेक गुण आहेत. अशा शब्दातीत सौ. बिंदाताईंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘त्यांच्याकडून अलौकिक व्यष्टी आणि समष्टी असे दैवी कार्य नेहमी व्हावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१०.९.२०२३)