राखीपौर्णिमेला बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातनचे ग्रंथ देऊन, तसेच राष्‍ट्र-धर्म यांच्‍याप्रती अभिमान वाढवणार्‍या ‘सनातन प्रभात’चे वाचक बनवून अनोखी ओवाळणी द्या !

राखीपौर्णिमेनिमित्त सर्वत्रच्‍या हिंदु बांधवांना आवाहन !

१. राखीपौर्णिमा आणि तिचे महत्त्व

‘श्रावण पौर्णिमा, म्‍हणजेच राखीपौर्णिमा ! ३०.८.२०२३ या दिवशी ‘राखीपौर्णिमा’ आहे. हिंदु संस्‍कृतीनुसार या दिवसाला अनन्‍यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्‍याच्‍या उजव्‍या हाताला राखी बांधते. यामागे ‘भावाचा उत्‍कर्ष व्‍हावा आणि भावाने आपले रक्षण करावे’, ही भूमिका असते. या दिवशी भाऊ बहिणीला पैसे अथवा तिला उपयोगी पडेल, अशी वस्‍तू ओवाळणी म्‍हणून देतो.

२. सध्‍याच्‍या काळानुसार श्रेष्‍ठ ओवाळणी !

राखीपौर्णिमेच्‍या दिनी आपल्‍या बहिणीला कपडे, दागिने आदी अशाश्‍वत भेटवस्‍तू देण्‍याऐवजी चिरंतन ज्ञानाचा प्रसार करणार्‍या सनातनच्‍या ग्रंथसंपदेतील ग्रंथ भेट देता येतील. त्‍याचप्रमाणे तिला ‘सनातन प्रभात’ या नियतकालिकाचे वाचकही बनवता येईल. सध्‍याच्‍या काळानुसार ही भेट देणे अधिक सयुक्‍तिक ठरेल.

३. सहजसोप्‍या भाषेत धर्मशास्‍त्र सांगून धर्माप्रती श्रद्धा वाढवणारे सनातनचे ग्रंथ !

सनातनने जुलै २०२३ पर्यंत अध्‍यात्‍म, साधना, देवतांची उपासना, आचारधर्म, बालसंस्‍कार, राष्‍ट्ररक्षण, धर्मजागृती आदी विषयांवरील ३६२ ग्रंथ आणि लघुग्रंथ यांच्‍या ९४ लाखांहून अधिक प्रती प्रकाशित केल्‍या आहेत. हे ग्रंथ १७ भाषांत उपलब्‍ध असून ते वाचकांना ‘काळानुसार आवश्‍यक साधना कोणती ? देवतांची उपासना कशी करावी ? धार्मिक उत्‍सव कसे साजरे करावेत ?’ आदी विषयांवरील अमूल्‍य ज्ञान सहजसोप्‍या भाषेत देतात. त्‍यामुळे त्‍यांची धर्माप्रती श्रद्धा वाढते.

४. साधनेचे महत्त्व बिंबवणारे आणि प्रतिकूल प्रसंगांना सामोरे जाण्‍यासाठी स्‍त्रियांमध्‍ये मनोधैर्य निर्माण करणारे ‘सनातन प्रभात’ !

सध्‍या सामाजिक परिस्‍थिती बिकट असल्‍याने स्‍त्रियांंना अनेक समस्‍यांना सामोरे जावे लागत आहेत. त्‍यामुळे त्‍यांना या समस्‍यांविषयी अवगत करून सतर्क करणे, ही काळाची आवश्‍यकता आहे. ‘सनातन प्रभात’ नियतकालिके अविरतपणे हे समाजोपयोगी कार्य करत आहेत. स्‍व-संरक्षणासाठी उद्युक्‍त करणारे, तसेच ‘साधनेचा आधार घेऊन प्रतिकूल प्रसंगांना सामोरे कसे जायचे ?’ यांविषयीची उपयुक्‍त माहिती देणारे लेख या नियतकालिकात नियमित प्रसिद्ध केले जातात. त्‍यामुळे कठीण प्रसंगांना सामोरे जाण्‍याचे मनोधैर्य स्‍त्रियांंमध्‍ये निर्माण होऊ लागते.

भगिनीच्‍या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवून जीवनात आमूलाग्र पालट करणार्‍या ‘सनातन प्रभात’चे तिला वाचक बनवणे आणि त्‍यातील अमूल्‍य माहिती वाचण्‍यास प्रवृत्त करणे, यांपेक्षा अन्‍य श्रेष्‍ठ ओवाळणी कोणती असेल ?

बहिणीला देण्‍यासाठी सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ हवे असल्‍यास त्‍यांची मागणी स्‍थानिक वितरकांकडे करता येईल. तिला वाचक बनवण्‍यासाठी www.SanatanPrabhat.org/subscribe/ या संकेतस्‍थळाला भेट द्यावी वा स्‍थानिक साधकांना संपर्क करावा.’

(३०.७.२०२३)