चीन आणि भारत यांच्‍यातील शत्रुत्‍वामुळे आशियामध्‍ये होत आहे पालट !

चीनसमोर ठामपणे उभे राहून भारताने चीनचे राष्‍ट्राध्‍यक्ष शी जिनपिंग यांच्‍या विस्‍तारवादाला खुले आव्‍हान दिले आहे. जगातील कोणत्‍याही सत्तेने हे केलेले नाही. सध्‍या हिमालयामध्‍ये चीनवर केलेली मात हे जिनपिंग यांनी भारताच्‍या सीमेवर युद्ध चालू केले; पण ते जिंकू शकले नाहीत, याची आठवण करून देत आहे.

३ वर्षांनी चीनने चोरपावलांनी भारताच्‍या हिमालयातील भागावर अतिक्रमण करणे चालू केले आहे. या दोन देशांमधील सीमेवरील संघर्ष हा चालू आहे. या दोन देशांतील लष्‍करांमध्‍ये मध्‍ये मध्‍ये होणार्‍या चकमकींकडे पाश्‍चिमात्‍य देशांचे लक्ष नाही; परंतु सीमेवरील वाढत असलेल्‍या या चकमकींमुळे चीन आणि भारत यांच्‍यामध्‍ये निर्माण झालेल्‍या दीर्घकालीन शत्रुत्‍वामुळे आशियाची भू राजनीती नवीन आकार घेत आहे.

चीनचे राष्‍ट्राध्‍यक्ष शी जिनपिंग

१. भारताकडून चीनच्‍या आशियावरील प्रभुत्‍वाला प्रतिबंध करण्‍याचा निश्‍चय

‘मोठ्या प्रमाणात युद्ध होऊ शकते’, हा धोका पत्‍करून भारताने चीनसमोर पाय रोवून त्‍याच्‍या सत्तेला खुले आव्‍हान दिले आहे की, जे अमेरिकेसह इतर कोणत्‍याही जागतिक सत्तेने या शतकात केलेले नाही. चीनचे राष्‍ट्राध्‍यक्ष शी जिनपिंग यांच्‍या धोरणात्‍मक विस्‍तारामुळे भारताने पूर्वीचे तुष्‍टीकरण करण्‍याचे धोरण सोडून लष्‍करी बळ वाढवून क्षमता असलेल्‍या भागीदाराशी शत्रूत्‍व पत्‍करून चीनच्‍या आशियावरील प्रभुत्‍वाला प्रतिबंध करण्‍याचा निश्‍चय केला आहे.

प्रा. ब्रह्मा चेल्लानी

२. चीनच्‍या विस्‍तारवादाला तोंड देण्‍यासाठी जपान आणि ऑस्‍ट्रेलिया यांनी केलेले पालट

तसेच शी जिनपिंग यांच्‍या बळावर आधारित सुधारणावाद आणि भू राजनीतीविषयी महत्त्वाकांक्षा यांमुळे जपान अन् ऑस्‍ट्रेलिया यांना चीनच्‍या ‘इंडो पॅसिफिक’ (भारत आणि प्रशांत महासागर) भागातील विस्‍तारवादाला तोंड देण्‍यासाठी त्‍यांच्‍या धोरणामध्‍ये पालट करावा लागला. जपानने वर्ष २०२७ पर्यंत लष्‍करावरील खर्चामध्‍ये दुप्‍पट वाढ करण्‍याचे ठरवून पॅसिफिक समुद्रातील संभाव्‍य युद्धासंबंधी राष्‍ट्रीय सुरक्षा धोरण ठरवले आहे. ऑस्‍ट्रेलियाने त्‍यांच्‍या बाजूने सीमाविषयक पूर्वीचे धोरण पालटून अमेरिका आणि इंग्‍लंड यांच्‍याशी संरक्षणविषयक ‘अकुस (ऑस्‍ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्‍टेट्‍स ऑफ अमेरिका – AUKUS) करार’ केला आहे.

३. भारताने लडाख भागात चीनसमोर वाकण्‍यास नकार देत सैन्‍याची नवी आघाडी उघडणे

(प्रतिकात्मक चित्र)

वर्ष २०२० मध्‍ये जेव्‍हा भारत जगातील सर्वांत कडक दळणवळण बंदीला सामोरा जात होता, तेव्‍हा ‘कोविड १९’चे निमित्त साधून शी जिनपिंग यांच्‍या धोरणानुसार चीनने भारतातील उत्तरेकडील बर्फाळ सीमा असलेल्‍या लडाख भागात अतिक्रमण करण्‍याचा प्रयत्न केला; परंतु भारतावर दबाव आणून ‘विरोध करणे व्‍यर्थ आहे’, असा विचार करून भारत नवीन परिस्‍थिती स्‍वीकारेल, हे जिनपिंग यांचे धोरण चुकले. याला उत्तर म्‍हणून भारताने चीनच्‍या लष्‍करापेक्षा अधिक लष्‍कर नियुक्‍त केले, तसेच हिमालयासारख्‍या दुर्गम भागात सर्वांत मोठ्या लष्‍कराची उभारणी केली. भारताने चीनसमोर वाकण्‍यास नकार दिला. भारताने हिमालयाच्‍या पूर्व भागामध्‍ये नवीन आघाडी उघडून चीनने वर्ष २०२० मध्‍ये बळकावलेल्‍या भागाच्‍या जवळील २ सहस्र किलोमीटर क्षेत्रात स्‍वतःची संरक्षण सिद्धता वाढवली. डिसेंबर २०२२ मध्‍ये हिमाचल प्रदेशमधील महत्त्वाच्‍या सीमेवर चीनने धोरणात्‍मक दृष्‍टीने अतिक्रमण करण्‍याचा केलेला प्रयत्न अमेरिकेच्‍या गुप्‍तहेर खात्‍याच्‍या साहाय्‍याने भारतीय लष्‍कराने उधळून लावला.

४. चीनचे तिबेट आणि अरुणाचल प्रदेश हे पुढचे लक्ष्य

(प्रतिकात्मक चित्र)

स्‍वतःची प्रादेशिक सीमा वाढवून आणि ती बळकट करून भारताची खोडी काढणे, या उद्देशाने चीनने अरुणाचल प्रदेशला ‘दक्षिण तिबेट’ संबोधून तेथील काही भागांचे चिनी भाषेत नामकरण केले. ‘तैवानपेक्षा दुप्‍पट क्षेत्रफळ असलेला अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग असून तो आमचा सार्वभौम अधिकार आहे’, अशी चीनच्‍या सरकारची भूमिका आहे. यामुळे भारताला तैवानच्‍या स्‍वयंपूर्ण दर्जाकडे लक्ष द्यावे लागेल. जर तैवान चीनच्‍या भक्षस्‍थानी पडला, तर ऑस्ट्‍रिया देशाच्‍या आकाराचा अरुणाचल प्रदेशचा चीनमध्‍ये समावेश करण्‍याचे चीन सरकारचे पुढील लक्ष्य होऊ शकते. वर्ष १९५१ मध्‍ये चीनने तिबेट राज्‍य कह्यात घेणे, हे दुसर्‍या महायुद्धानंतर झालेला महत्त्वाचा भू राजनीतीमधील पालट आहे. यामुळे चीनच्‍या सीमेचा भारत, नेपाळ, भूतान आणि म्‍यानमार या देशांशी संबंध प्रस्‍थापित झाला. चीनने तैवान कह्यात घेतल्‍यास भू राजनीतीमध्‍ये असाच पालट होऊन चीनच्‍या नौदलाला मधल्‍या बेटांची पहिली साखळी तोडून पॅसिफिक समुद्रात सहज प्रवेश करता येईल.

५. चीनने तैवानचे लक्ष्य ठेवण्‍यामागील कारण

‘तैवान हा नेहमी चीनचाच भाग होता’, हा चीनचा दावा ऐतिहासिक दृष्‍टीने संशयास्‍पद आहे. १९ व्‍या शतकाच्‍या शेवटच्‍या भागात तैवान हा चीनचा भाग नव्‍हता. त्‍यानंतर ८ वर्षांनी छिंग राजवंशाच्‍या राजवटीमध्‍ये चीन-जपान युद्धामध्‍ये चीनचा पराभव झाल्‍याने चीनने हा भाग जपानच्‍या कह्यात दिला होता; परंतु ‘तैवानवर आपला हक्‍क आहे’, असे सांगत शी जिनपिंग हे माओ झेडाँग यांचे ‘ग्रेटर चायना’ हे स्‍वप्‍न पुरे करू इच्‍छित आहेत.

हिमालयामध्‍ये चीनचा विस्‍तार करण्‍यास तिबेट ही किल्ली आहे. खरे म्‍हणजे मोंगोल आणि मानचुस यांनी जेव्‍हा चीनवर आक्रमण केले होते, तेव्‍हा तिबेट हा चीनचा भाग होता. चीन हिमालयातील भाग आपला असल्‍याचा दावा करून शकत नसल्‍याने त्‍याने तिबेटशी संबंध जोडला आहे. लहानशा भूतानलाही चीनने सोडलेले नाही. त्‍याच्‍याही सीमेचे चीन लचके तोडत आहे.

६. भारताने चीनला दिलेल्‍या आव्‍हानाविषयी अमेरिकेच्‍या नौदलाचे प्रमुख अ‍ॅडमिरल मायकेल एम्. गिल्‍डे यांचे मत

अमेरिकेच्‍या नौदलाचे प्रमुख अ‍ॅडमिरल मायकेल एम्. गिल्‍डे (डावीकडील)

या सर्व पार्श्‍वभूमीवर भारताची चीनच्‍या विरोधात उभे रहाण्‍याची सिद्धता त्‍याच्‍या विस्‍तारवादाला कमकुवत करत आहे. अमेरिकेच्‍या नौदलाचे प्रमुख अ‍ॅडमिरल मायकेल एम्. गिल्‍डे यांनी गेल्‍या वर्षी ‘भारताने चीनसमोर दुहेरी पेच निर्माण केला आहे’, असे म्‍हटले होते. त्‍यांनी म्‍हटले आहे, ‘‘भारताने चीनला केवळ पूर्वेकडेच नव्‍हे, तर दक्षिण चीन समुद्र आणि तैवान समुद्रधुनीकडे लक्ष द्यायला भाग पाडले आहे. त्‍यांना भारताकडून काही धोका होऊ शकतो, याविषयी चिंता करायला लावली आहे.’’

७. चीनच्‍या तुलनेत भारताची अर्थव्‍यवस्‍था वाढणारी

याखेरीज चीनच्‍या अर्थव्‍यवस्‍थेवर दीर्घकालीन अडथळे येत असतांना चीन-भारत यांच्‍यात शत्रूत्‍व वाढले आहे, ज्‍यात न्‍यून होत चाललेली आणि वेगाने वृद्धी होत असलेली लोकसंख्‍या अन् उत्‍पादकता वाढीचा वेग न्‍यून आहे. याउलट भारताकडील लोकसंख्‍येमध्‍ये २८ ते ४० या मधल्‍या वयोगटातील लोक अधिक प्रमाणात आहेत. जरी चीनच्‍या तुलनेत भारताचे सकल देशांतर्गत उत्‍पादन (जीडीपी) अल्‍प असले, तरी ती जगातील सर्वांत जलद वाढणारी अर्थव्‍यवस्‍था आहे.

८. चीनच्‍या अतिक्रमण धोरणामागील कारण

भारतातील हिमालयामधील वातावरणात उंच डोंगर असल्‍याने भारतीय लष्‍कर भूमीवरील आणि डोंगरी भागातील युद्धामध्‍ये जगातील सर्वांत अनुभवी लष्‍कर आहे. भारताच्‍या स्‍वयंसेवी लष्‍कराच्‍या तुलनेत चीनची ‘लिबरेशन फ्रंट आर्मी’ मोठ्या प्रमाणात १८ वर्षे वयानंतर २ वर्षे स्‍वयंसेवी सेवा देणार्‍या सैनिकांवर अवलंबून आहे. त्‍यामुळे चीन प्रत्‍यक्ष युद्ध न करता चोर पावलांनी अतिक्रमण करण्‍याचे धोरण का अवलंबत आहे ? याचे उत्तर मिळते.

९. भारत आणि अमेरिका जवळ येणे, हे चीनच्‍या विस्‍तारवादी राजवटीवर मर्यादा आणणारे

सध्‍याच्‍या हिमालयामधील लष्‍करी पेचावरून शी जिनपिंग यांनी भारताशी सीमेवर युद्ध अवलंबले असून ते हे युद्ध जिंकू शकत नाहीत, हे लक्षात येते. अमेरिका-चीन यांच्‍यामधील शत्रूत्‍व वाढत आहे आणि चीनचे त्‍याच्‍या सर्वांत मोठ्या शेजारी असलेल्‍या देशाला कायमचा शत्रू बनवेल. शेवटी भारत आणि अमेरिका हे जवळ आल्‍यास त्‍याचा परिणाम म्‍हणजे शी जिनपिंग यांच्‍या विस्‍तारवादी आक्रमक राजवटीवर मर्यादा येईल.

– प्रा. ब्रह्मा चेल्लानी, नवी देहली

(साभार : https://chellaney.net/)

(प्रा. ब्रह्मा चेल्लानी हे ‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’ या केंद्रात ‘स्‍ट्रेटेजिक स्‍टडीज’ (धोरणात्‍मक अभ्‍यास) या विषयाचे प्राध्‍यापक आहेत. त्‍यांना बर्लिन (जर्मनी) येथील ‘रॉबर्ट बॉश अकादमी’ ही शिष्‍यवृत्ती मिळाली असून त्‍यांनी एकूण ९ पुस्‍तके लिहिली आहेत.)

 

संपादकीय भूमिका

भारताने चीनच्‍या कूटनीतीला मुत्‍सद्देगिरीने प्रत्‍युत्तर देण्‍यासह त्‍याची नांगी कायमची ठेचण्‍यासाठी लष्‍करी कारवाईही करणे आवश्‍यक !