सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हातांची धार्मिक सोहळ्यांच्या वेळी होणारी वैशिष्ट्यपूर्ण मुद्रा आणि तिच्या विविध छायाचित्रांतून प्रक्षेपित होणारी पंचतत्त्वांच्या स्तरावरील वैशिष्ट्ये

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील नम्रतेचे दर्शन घडवणारी त्यांची हातांची नमस्कारासारखी मुद्रा !

‘सर्वसामान्यपणे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव त्यांच्यासंदर्भात कोणतेही धार्मिक विधी होत असतांना, साधक त्यांच्याविषयी काही सांगत असतांना किंवा सप्तर्षींच्या आज्ञेने त्यांच्यासाठी नृत्य-गायन सेवा सादर होत असतांना अत्यंत विनम्रतेने हात जोडून बसतात. शारीरिक स्थितीनुसार हात अवघडले की, काही वेळाने ते जोडलेले हात खाली खाली येऊ लागतात. त्यातही जेवढे जोडले जातील, तेवढे त्यांनी जोडून ठेवलेले असतात. वास्तविक तो नमस्कारच; पण थोड्या वेळाने केवळ बोटांची टोके जोडलेल्या स्थितीत रहातात आणि हातांच्या दोन्ही तळव्यांच्या मध्ये पोकळी निर्माण होते.

श्री गुरुपादुका धारण सोहळ्यात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ करत असलेली कृती पहात असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या हातांची शक्तीतत्त्वाचे अधिक्य असलेली मुद्रा (वर्ष २०१९) ! गोलात मुद्रा मोठी करून दाखवली आहे.
श्रीविष्णुतत्त्व जागृती सोहळ्यात साधिकेने सादर केलेली नृत्यसेवा पाहून भाव जागृत झालेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हातांची भावाची स्पंदने प्रक्षेपित करणारी मुद्रा
सुवर्णाभिषेक सोहळ्यात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ करत असलेल्या पुष्पार्चनेतील स्पंदने अनुभवतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हातांची झालेली चैतन्यदायी मुद्रा (वर्ष २०१९) ! गोलात मुद्रा मोठी करून दाखवली आहे.

१. अत्यंत शारीरिक त्रास होत असूनही सोहळ्यात हालचाल न करता बसणे

सप्तर्षींच्या आज्ञेने पार पडलेल्या पाद्यपूजन सोहळ्यात डोळे बंद करून वेदमंत्रपठण ऐकत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हातांची आनंदाची स्पंदने प्रक्षेपित करणारी मुद्रा

अत्यंत शारीरिक त्रास होत असतांनाही ते सप्तर्षींच्या आज्ञेने धार्मिक सोहळ्यांमध्ये सहभागी होतात. पुढील पिढ्यांना गुरुदेवांचा हा अवतारी इतिहास कळावा, यासाठी या सोहळ्यांचे चित्रीकरण केले जाते, तसेच विविध क्षणांची छायाचित्रे काढण्याची सेवाही सलग चालूच असते. त्यामुळे सोहळ्यांमध्ये बसतांना चित्रीकरणात योग्य दिसेल, अशाच पद्धतीने बसावे लागते. सर्वसामान्यपणे व्यक्ती थोडा वेळ सतर्कतेने बसू शकते. सलग २-३ घंटे एकाच स्थितीत सतर्कतेने बसणे सामान्य शारीरिक स्थिती असलेल्यांनाही शक्य होत नाही. थोडी तरी पायांची हालचाल करणे, पाठीला आधार घेऊन जरा सहज बसणे, असे केले जाते. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव मात्र समष्टीसाठी चित्रीकरण व्हावे, छायाचित्रे योग्य प्रकारे टिपता यावीत, याची काळजी घेऊन बसतात.

२. स्वतःचे पंचप्राण एकवटून समष्टीला सोहळ्यांचा आध्यात्मिक लाभ होण्यासाठी प्रयत्न करणे

मयन महर्षींच्या आज्ञेने साधकांना श्रीसत्यनारायण रूपात दर्शन देतांना ध्यानस्थितीत गेल्यानंतर शांतीची स्पंदने प्रक्षेपित करणारी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हातांची मुद्रा (वर्ष २०१९)

काही वेळा त्यांची प्राणशक्ती अत्यल्प असते. अशा स्थितीत सामान्य व्यक्तीला जिवंत रहाणेही अशक्य असतांना सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव अत्यंत नम्रतेने हात जोडून घंटोन्‌घंटे बसतात, हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांच्या त्या मुद्रेचे समष्टीला होणारे लाभ पहाता ‘ज्याप्रमाणे दधिची ऋषींनी समष्टीच्या कल्याणासाठी त्यांच्या अस्थींचे दान केले, त्याप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव स्वतःचे पंचप्राण एकवटून समष्टीला धार्मिक सोहळ्यांचा अधिकाधिक आध्यात्मिक स्तरावर लाभ करून देत आहेत’, असे जाणवते.’

– कु. सायली डिंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.४.२०२३)


सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हातांच्या मुद्रा दर्शवण्यासाठी निवडलेल्या ५ छायाचित्रांमधून पंचमहाभूतांपैकी एकेका महाभूताची अनुभूती प्राधान्याने येत असणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हातांची मुद्रा दर्शवणारी ५ छायाचित्रे मी जेव्हा पाहिली, तेव्हा मला ती वैशिष्ट्यपूर्ण वाटली. त्या ५ छायाचित्रांमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हातांची मुद्रा एकच होती; पण तरीही ‘प्रत्येक मुद्रेतून वेगवेगळी स्पंदने प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवले. मी बारकाईने अभ्यास केला, तेव्हा मला लक्षात आले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या विविध कृतींनुसार, उदा. ते डोळे उघडे ठेवून पहात असणे, त्यांचे डोळे मिटलेले असणे, ते ध्यानावस्थेत असणे इत्यादींनुसार त्यांच्या झालेल्या हातांच्या मुद्रेतून पंचमहाभूतांपैकी वेगवेगळ्या महाभूताची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत.’ पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांमुळे अनुक्रमे शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची स्पंदने प्रक्षेपित होतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हातांची मुद्रा बघून मला आलेल्या अनुभूतींचे वर्णन पुढील सारणीमध्ये दिले आहे.

 

वरील सारणीतून लक्षात येते की, ५ छायाचित्रांतून क्रमाने शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची स्पंदने सर्वाधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. यावरून कळते की, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हातांची मुद्रा दर्शवणारी कोणती आणि किती छायाचित्रे निवडायची ?’, हेही ईश्वरी नियोजनच होते. त्यामुळे पंचमहाभूतांशी संबंधित ५ छायाचित्रेच निवडण्यात आली. आपण स्वतः कोणतीच कृती करू शकत नाही. सर्व ईश्वराधीन असते आणि आपण साधना करत असतांना केवळ त्याची लीला अनुभवायची असते, म्हणजेच त्याची अनुभूती घ्यायची असते. गुरुकृपेनेच हे यातून शिकायला मिळाले.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१७.४.२०२३)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक