‘ऑनलाईन गेमिंग’च्‍या माध्‍यमातून पाकिस्‍तानचे भारतामध्‍ये हिंदूंच्‍या धर्मांतराचे षड्‍यंत्र !

  • मुख्‍य सूत्रधाराच्‍या शोधासाठी पोलिसांच्‍या मुंबई आणि ठाणे येथे धाडी !

  • इस्‍लाम धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्‍या व्हिडिओंचा धर्मांतरासाठी उपयोग !

मुंबई – उत्तरप्रदेशमधील गाझियाबाद येथे ‘ऑनलाईन गेमिंग’च्‍या माध्‍यमातून अल्‍पवयीन हिंदू मुलांचे धर्मांतर करणार्‍या षड्‍यंत्रामागील मुख्‍य आरोपी शाहनवाज खान याचा शोध घेण्‍यासाठी महाराष्‍ट्र पोलिसांनी उत्तरप्रदेशच्‍या पोलिसांच्‍या साहाय्‍याने मुंबईसह ठाणे परिसरात विविध १० ठिकाणी धाडी टाकल्‍या आहेत; मात्र  मुंब्रा येथील मुख्‍य आरोपी सूत्रधार शाहनवाज खान याने नातेवाइकांसह घर सोडून पलायन केले आहे. राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेकडूनही या प्रकरणी अन्‍वेषण चालू केले आहे.

गाझियाबाद येथील पोलिसांनी या लिंकची पडताळणी केली असता पाकिस्‍तानमधून त्‍यांची हाताळणी होत असल्‍याचे आढळून आले. हिंदूंचे धर्मांतर करण्‍यासाठी अग्रणी असलेला आणि सध्‍या भारतामधून पलायन केलेला इस्‍लाम धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्‍या व्‍हिडिओचा धर्मांतरासाठी उपयोग करण्‍यात येत असल्‍याचे उघड झाले आहे.

गाझियाबाद येथील पोलीस ठाण्‍यात हिंदु कुटुंबातील एका अल्‍पवयीन मुलाच्‍या पालकांनी केलेल्‍या तक्रारीतून ‘ऑनलाईन गेमिंग’च्‍या माध्‍यमातून अल्‍पवयीन हिंदु मुलांचे धर्मांतर करण्‍याचा प्रयत्न चालू असल्‍याचा प्रकार उघडकीस आला. गाझियाबाद येथून एका मौलवीला झालेल्‍या अटकेतून याचा मुख्‍य सूत्रधार शाहनवाज खान असल्‍याचे आढळून आले.

हिंदु नावाने बनावट खाते सिद्ध करून धर्मांतर !

शाहनवाज हा ‘फोर्ट नाईट गेम’ आणि ‘डिस्‍कॉर्ड’ या अ‍ॅपवर हिंदू नावाने बनावट खाते सिद्ध करून अल्‍पवयीन तरुणांच्‍या ‘गेमिंग ग्रुप’मध्‍ये सामील व्‍हायचा. खेळात सहभागी मुलांना तो खेळाचे विविध बारकावे शिकवायचा. जिंकण्‍यासाठी तो मुलांना धार्मिक प्रार्थना म्‍हणायला लावायचा आणि जिंकून द्यायचा. ‘इस्‍लामनुसार प्रार्थना केल्‍यामुळे खेळ जिंकता येतो’, असे मुलांच्‍या मनावर बिंबवून त्‍यांचे धर्मांतर करत होता.

(म्‍हणे) ‘४०० काय ४ तरी धर्मांतर केलेले दाखवा !’

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्‍हाड यांचा थयथयाट !

मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांनी मुंब्‍यात ६० टक्‍के हिंदु असल्‍याचे सांगून येथे ‘४०० काय ४ जणांचे तरी धर्मांतर झालेले दाखवा’ असे म्‍हटले आहे. (या संदर्भातील व्‍हिडिओ प्रसारमाध्‍यमांतून प्रसारित होत आहे आणि राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणा याचा तपास करत आहेत. त्‍यापेक्षा आव्‍हाड  स्‍वतःला मोठे समजतात का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • अल्‍पवयीन हिंदू मुलांच्‍या धर्मांतराचे हे मोठे षड्‍यंत्र नष्‍ट करण्‍यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करायला हवेत !
  • हिंदु पालकांनीही आपल्‍या मुलांना यासंदर्भात सजग करून त्‍यांना धर्मशिक्षण द्यायला हवे. तसे झाल्‍यास ही मुले अशा षड्‍यंत्राला बळीच पडणार नाहीत !