झाकीर नाईक याच्याकडून ओमानमध्ये हिंदु महिलेचे सार्वजनिकरित्या धर्मांतर

भारतात मुसलमानांवर अत्याचार होत असल्याचाही आरोप !

मस्कत (ओमान) – धार्मिक द्वेष पसरवणे, आर्थिक गैरव्यवहार यांप्रकरणी भारतातून पसार असणारा आणि जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारा झाकीर नाईक याने ओमानमध्ये एका हिंदु महिलेचे सार्वजनिकरित्या धर्मांतर केल्याची घटना समोर आली आहे.

१. धर्मांतर करतांना झाकीर याने या महिलेला विचारले की, तुम्ही मानता का ईश्‍वर एकच आहे ? तुम्ही मानता का की, केवळ अल्लाच्या व्यतिरिक्त अन्य कुणाचीही पूजा करू नये ? मूर्तीपूजा चुकीची आहे ? महंमद पैगंबर शेवटचे पैगंबर होते ? या प्रश्‍नांना या महिलेने होकारार्थी उत्तर दिले. या महिलेचे धर्मांतर झाल्यावर झाकीर म्हणाला की, आता तुम्ही तुमचे कुटुंब आणि मित्र यांनाही इस्लाम स्वाकारण्याचे माध्यम बनावे.

२. झाकीर म्हणाला की, भारतातील बहुसंख्य हिंदु माझ्यावर प्रेम करतात. त्यामुळेच सहस्रो लोक माझी व्याख्याने ऐकायला येतात. मतेपढीच्या राजकारणामुळे मला लक्ष्य केले जात आहे. भारतात मुसलमानांवर अत्याचार होत आहेत.

भारत सरकार झाकीर याला परत आणण्याच्या प्रयत्नात !

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, झाकीर नाईक याला भारतात आणण्यासाठी सर्व आवश्यक कारवाई केली जाईल. तो भारतातील पसार आरोपी आहे. या प्रकणी ओमान सरकारकडे आम्ही सूत्र उपस्थित करून झाकीर याला भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहोत.