‘छत्रपती शिवाजी महाराजांची ‘सर्वधर्मसमभावी’ अशी प्रतिमा जाणीवपूर्वक उभी केली जात आहे. केवळ धर्माचा विचार केल्यास ते सर्वधर्मसमभावी होते; मात्र राजकारणाचा विचार केल्यास शिवराय कट्टर हिंदुत्वनिष्ठ होते.’
– ज्येष्ठ समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर, पुणे.
हिंदूंवर होणारा अत्याचार थांबवायचा असेल, तर हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण ठेवून कृती करणे आवश्यक !
‘छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाला त्याचा कोथळा काढून यमसदनी पाठवले आणि हिंदू जनतेला भयमुक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पराक्रम विसरता कामा नये. सध्या हिंदूंवर होणार्या अन्यायाच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण ठेवून कृती करायला हवी.’
– श्री. शिवप्रसाद जोशी, हिंदुत्वनिष्ठ, गोवा. (१३.१२.२०१०)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे उच्चकोटीचे कार्य करण्यासाठी त्यांचे प्रतिदिन स्मरण करणे आवश्यक !
‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला, या वादात पडण्यापेक्षा ३६५ दिवस महाराजांची जयंती साजरी करा. त्यांचे कार्य इतके मोठे आहे की, प्रत्येक दिवशी त्यांचे स्मरण करण्याची आवश्यकता आहे. या कार्यात प्रत्येकाने सहभागी होण्याची आवश्यकता आहे.’
– छत्रपती संभाजी राजे, शाहू महाराजांचे वंशज