वेलवर्गीय भाज्‍यांच्‍या बिया कशा लावाव्‍यात ?

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ६७

सौ. राघवी कोनेकर

‘जानेवारी आणि फेब्रुवारी मासांत दुधी, दोडके, घोसाळे, भोपळा, कारले, काकडी अशा वेलवर्गीय भाज्‍यांची लागवड करतात. या भाज्‍यांच्‍या बिया शेतात लावतांना त्‍या थेट मातीत पेरल्‍या जातात. घरगुती लागवडीमध्‍ये मात्र या बिया मातीत थेट न पेरता आधी माती घातलेल्‍या कागदी कपांत प्रत्‍येकी १ बी लावून रोपे सिद्ध करावीत. रोपे सिद्ध झाल्‍यावर त्‍यांची वाफ्‍यांत किंवा मोठ्या कुंड्यांत लागवड करावी. हे अधिक सोपे आणि सोयीचे होते. असे केल्‍याने रोपे उगवून आल्‍यावर त्‍यांतील सशक्‍त रोपांची निवड करून वेल चढवण्‍यासाठी केलेल्‍या मांडवाखाली त्‍यांची लागवड करता येते. कपामध्‍ये लावलेले बी अंकुरित होऊन रोपाला ४ ते ६ पाने आल्‍यावर रोप योग्‍य ठिकाणी लावावे.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२०.१.२०२३)