देवळात प्रदक्षिणा घातल्याने व्यक्तीला होणारे आध्यात्मिक स्तरावरील लाभ !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘देवळात देवतेचे दर्शन घेतल्यावर आपण तिला प्रदक्षिणा घालतो. प्रदक्षिणा घातल्याने आपल्याला चैतन्य मिळते. ‘देवळात प्रदक्षिणा घातल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी प्रदक्षिणा घालण्यापूर्वी आणि प्रदक्षिणा घातल्यानंतर आध्यात्मिक त्रास असलेले आणि नसलेले साधक यांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत आध्यात्मिक त्रास असलेले आणि नसलेले साधक यांनी एका गणपतीच्या मंदिरातील मूर्तीचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा घातल्या.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’
या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.


१ अ. देवळात प्रदक्षिणा घातल्यानंतर आध्यात्मिक त्रास असलेले आणि नसलेले साधक यांच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ अल्प होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे : देवळात प्रदक्षिणा घालण्यापूर्वी आध्यात्मिक त्रास असलेले आणि नसलेले साधक यांच्यामध्ये नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा होत्या. त्यांनी प्रदक्षिणा घातल्यानंतर त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून किंवा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

सौ. मधुरा कर्वे

२ अ. प्रदक्षिणा घातल्याने आध्यात्मिक त्रास असलेले आणि नसलेले साधक यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे : देवळाच्या गाभार्‍यात असलेले चैतन्य गाभार्‍यात आणि गाभार्‍याच्या भोवती गोलाकार दिशेने फिरत असते. प्रदक्षिणा घातल्यावर या चैतन्याचा लाभ प्रदक्षिणा घालणार्‍याला होतो. चाचणीतील आध्यात्मिक त्रास असलेले आणि नसलेले साधक यांनी हे चैतन्य त्यांच्या भावानुसार ग्रहण केले. त्यामुळे त्यांच्यावरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण पुष्कळ प्रमाणात अल्प होऊन त्यांच्यातील सात्त्विकता पुष्कळ वाढली. यातून ‘प्रदक्षिणा घातल्याने व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावरील लाभ होतात’, हे लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२०.१२.२०२२)

ई-मेल : [email protected]

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.