सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ६५
‘जीवामृत सिद्ध करण्याची कृती आपण याआधीच्या लेखांतून समजून घेतलेली आहे. आता त्यासंबंधी अन्य सूत्रे जाणून घेऊ.
१. जीवामृत धातूच्या भांड्यात बनवू नये. प्लास्टिकचे किंवा मातीचे भांडे वापरावे.
२. जीवामृत सिद्ध केलेल्या भांड्याला किंवा ड्रमला झाकण लावू नये. ते कापडाने किंवा गोणपाटाने झाकावे.
३. जितके लिटर जीवामृत करायचे असेल, त्यापेक्षा अधिक क्षमतेचे भांडे घ्यावे. त्यामुळे जीवामृत ढवळणे सोपे होते.
४. जिवामृताचे भांडे नेहमी सावलीमध्ये ठेवावे, तसेच त्यावर पावसाचे पाणी पडू देऊ नये.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१०.०१.२०२२)
________________________________________
जीवामृताविषयी सविस्तर माहितीसाठी सनातन संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्या.
मार्गिका – https://www.sanatan.org/mr/a/83659.html
______________________________