दत्ताचे विडंबन रोखणे

सध्या देवतांचे विविध प्रकारे विडंबन होते, उदा. चित्रकार श्री. संजीव खांडेकर यांनी रेखाटलेले दत्ताचे विद्रूप चित्र ‘डीएन्ए’ या इंग्रजी दैनिकाच्या मुंबई आवृत्तीने प्रसिद्ध केले, हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची नग्न चित्रे काढून ती विक्रीसाठी ठेवली; व्याख्याने, पुस्तके आदींच्या माध्यमातून देवतांवर टीका केली जाते; देवतांची वेशभूषा करून भीक मागितली जाते, व्यापारी हेतूने विज्ञापनांमध्ये (जाहिरातींमध्ये) देवतांचा ‘मॉडेल’ म्हणून वापर केला जातो. नाटक-चित्रपटांतूनही विडंबन सर्रास होते.


धर्मरक्षणासाठी कार्यात सहभागी व्हा !

‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘सनातन संस्था’ गेली काही वर्षे देवता अन् संत यांचे होणारे विडंबन, उत्सवांतील अनुचित प्रकार, धर्मद्रोही कायदे इत्यादींच्या विरोधात वैध (सनदशीर) मार्गाने व्यापक जनजागृती चळवळी राबवत आहेत. दत्तभक्तांनो, आपणही त्यांत सहभागी होऊन धर्माप्रती आपले कर्तव्य पार पाडा !