
‘कर्म करीन, तर त्याचे फळही घेईन’, असे म्हणणे निदान प्रकृतीला धरून प्रामाणिकपणाचे तरी आहे; पण मनुष्य स्वभाव इथेच थांबत नाही. त्याचा स्वार्थ इतका मर्यादित रहात नाही. पुण्यामुळे मिळणारी फळे त्याला हवी असतात; पण पुण्याचरणाचे कष्ट मात्र त्याला नको वाटतात. उलट शरिराला किंवा मनाला सुखावह वाटते म्हणून तो विविध प्रकारची पातके वा वाईट गोष्टी प्रयत्नपूर्वक करत असतो. ही तर सरळ सरळ विकृती आहे.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ‘जीवनसाधना’ ग्रंथातून)