(म्हणे) ‘झाकीर नाईक यांना आम्ही आमंत्रित केलेले नाही !’

भारताच्या आक्षेपानंतर कतारचे स्पष्टीकरण !

दोहा (कतार) – कतारमध्ये चालू असलेल्या फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेमध्ये उपस्थित रहाण्यासाठी कतारकडून भारतासाठी पसार असणार्‍या झाकीर नाईक याला आमंत्रण देण्यात आले होते. सध्या तो कतारमध्ये धार्मिक व्याख्याने देत आहे. त्याला आमंत्रण देण्यावरून भारताने कतारकडे आक्षेप नोंदवला होता. यावर आता कतारने स्पष्टीकरण दिले आहे. कतारने म्हटले आहे की, आम्ही झाकीर याला कोणतेही अधिकृत निमंत्रण दिले नव्हते. अन्य देशांनी जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवली जेणेकरून कतार आणि भारत यांच्यातील संबंध बिघडावेत.

१. भारताने कतारकडे आक्षेप नोंदवतांना म्हटले होते की, जर झाकीर नाईक अतीमहनीय व्यक्तींच्या कक्षात बसून फुटबॉल सामना बघत असल्याचे दिले, तर आम्हाला आमचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा दौरा रहित करावा लागेल; मात्र नंतर धनखड स्पर्धेच्या उद्घाटन समारोहाला उपस्थित राहिले होते.

२. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथील ‘मिडल ईस्ट मीडिया रिसर्च इन्स्टिट्यूट’ या संस्थेने सर्वप्रथम म्हटले होते की, झाकीर याला उद्घाटन समारंभासाठी कतारकडून आमंत्रित करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

कतारच्या या विधानावर कोण विश्‍वास ठेवणार ? झाकीर नाईक याला कतारने आमंत्रित केले नाही, तर तो अचानक आणि तेही फुटबॉल सारख्या खेळासाठी तेथे का आणि कशाला पोचेल ?