मैत्री न केल्यास उचलून नेण्याची धमकी !
रांची (झारखंड) – रांची जिल्ह्यातील ओरमांझी येथील शाळेतील ९ वीच्या वर्गात हत्यारांसह घुसून मुसलमान तरुणांनी हिंदु विद्यार्थिनींची छेड काढत त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी दबाव टाकला. ‘जर मैत्री केली नाही, तर तुम्हा सगळ्यांना उचलून घेऊन जाऊ’, अशी धमकी दिली. या वेळी शाळेतील शिक्षक आणि शाळेजवळील काही तरुण यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यावर या मुसलमान तरुणांनी त्यांनाही ‘बघून घेऊ’ अशी धमकी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून हे तरुण या विद्यार्थिनींची शाळेत जातांना छेड काढत होते. या विद्यार्थिनींनी त्यांच्या पालकांनाही याविषयी सांगितले होते. याविषयी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
Jharkhand: Muslim youths brandishing weapons threaten girls to befriend them or else face the consequences: Report https://t.co/CdHDKIfb1Z
— OpIndia.com (@OpIndia_com) September 11, 2022
१. या संदर्भात शाळेच्या आवारात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी गावकर्यांनी आरोपी युवकांना बोलावून येथेच निर्णय घेण्याची मागणी केली. त्या वेळी पोलीस तेथे पोचले. गावकर्यांनी आरोपी फिरदौस अंसारी, सुहैल अंसारी, मुजम्मिल अंसारी, तौफिक अंसारी आणि जमील अंसारी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांनी निवेदन दिले. (असे निवेदन का द्यावे लागते ? पोलीस स्वतःहून गुन्हा का नोंदवत नाहीत ? – संपादक)
२. या शाळेतील विद्यार्थ्यांनी सांगितले की, मायापूरमधील काही विद्यार्थी अन्य गावातील तरुणांना बोलावून शाळेच्या शेजारी मद्यपान करत असतात. तसेच विद्यार्थिनींवर अश्लील शेरेबाजी करत असतात. कधी कधी भिंत ओलांडून शाळेत घुसतात आणि विद्यार्थिनींची छेड काढतात. विरोध केल्यावर शिक्षकांनाही धमकी दिली जाते. यांतील काही तरुण याच शाळेत शिकत होते. त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलेले आहे.
संपादकीय भूमिका
|