(भाग २०)
घराचे रंगकाम, वास्तूतील स्पंदने आणि साधना यांचा एकमेकांशी असलेला परस्परपूरक संबंध !
३. वास्तूतील स्पंदने आणि त्यांवर होणारा साधनेचा परिणाम !
जर एखादी व्यक्ती योग्य साधना करत असेल किंवा त्या घरातील अधिकाधिक सदस्य साधना करत असतील, तर अनिष्ट शक्तींनी निर्माण केलेले त्रासदायक शक्तीचे आवरण साधनेमुळे नष्ट होते. सध्या धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदू योग्य प्रकारची साधना करत नाहीत, तसेच पुष्कळ घरांमध्ये पितृदोष असतो. साधनेच्या अभावामुळे घरात आध्यात्मिक त्रासाची तीव्रता अधिक असते आणि अशातच गोबर रंगकाम न केल्यास वास्तूतील स्पंदने नकारात्मक होतात.
४. चैतन्यहीन विज्ञानाने केलेली कुरघोडी !
रंगकाम नियमित होत नसल्यामुळे घरात अनावश्यक वस्तूंचा ढीग साचतो. यासाठीच हिंदु धर्मात प्रत्येक दीपावलीला आपण आपल्या घराचे रंगकाम करतो; परंतु चैतन्यहीन विज्ञानाने येथेही कुरघोडी करून चैतन्य निर्माण करण्यात अडथळा आणून कृत्रिम रासायनिक तत्त्वांनी बनवलेले रंग उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे घराच्या भिंतींना ५ ते ७ वर्षे रंगकाम करण्याची आवश्यकताच भासत नाही.
५. प्रत्येक वर्षी किंवा किमान ३ वर्षांतून एकदा घराचे रंगकाम करावे !
आमच्या द्रष्ट्या महर्षींना हे ठाऊक होते की, घराचे रंगकाम प्रत्येक वर्षी करणे आवश्यक आहे; कारण यामुळे केवळ स्थूल स्वच्छता होत नाही, तर सूक्ष्म स्वच्छतासुद्धा होते. हा दृष्टीकोन लक्षात ठेवून जर प्रत्येक वर्षी शक्य नसेल, तर किमान ३ वर्षांतून एकदा तरी घराचे रंगकाम अवश्य करावे.
(क्रमश:)
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (३०.२.२०२२)