आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

(भाग २०)

घराचे रंगकाम, वास्तूतील स्पंदने आणि साधना यांचा एकमेकांशी असलेला परस्परपूरक संबंध !

पू. तनुजा ठाकूर

‘आतापर्यंत आपल्याला, अग्निदेव, स्थानदेवता, ग्रामदेवता आणि अन्नपूर्णादेवी यांना प्रसन्न करण्यासाठीचे सोपे उपाय सांगितले. ते केल्यास आपत्काळात आपल्यावर सदैव त्यांची कृपा राहील. आजच्या लेखातून वास्तूदेवतेला प्रसन्न करण्यासाठीचे काही उपाय मी सांगणार आहे. साधना योग्य प्रकारे व्हावी आणि घरात सुख-शांती रहावी, यासाठी वास्तुदेवता प्रसन्न होणे अत्यंत आवश्यक असते.

सर्वप्रथम आपण ‘वास्तू’ म्हणजे काय आहे ? हे समजून घेऊया. ज्या स्थानावर चार भिंती उभ्या केल्या जातात, तिला ‘वास्तू’ असे म्हणतात. तेथे जी शक्ती निर्माण होते, तिला ‘वास्तुदेवता’ म्हणतात.

आपत्काळात वास्तुदेवता प्रसन्न रहावी आणि वास्तूतील स्पंदने सकारात्मक रहावीत, यादृष्टीने कोणती काळजी घ्यावी ? याविषयीची सूत्रे येथे सांगते.

१. कृत्रिम रसायनांनी बनवलेले रंग राजसिक किंवा तामसिक, तर शेण आणि माती, तसेच चुन्याचा रंग सर्वांत सात्त्विक असणे

वर्तमानकाळात सर्वांच्या घरात आधुनिक उपकरणे आणि अन्य वस्तू यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे लोक घराला रंग देतात. भिंती खराब होऊ नयेत आणि प्रत्येक वर्षी रंग देण्याचे कष्ट घ्यावे लागू नयेत, हा त्यामागील उद्देश असतो. मला सूक्ष्मातून असे लक्षात आले की, शेण आणि माती यांच्या रंगांनंतर चुन्याने दिलेला रंग सर्वांत सात्त्विक असतो. सर्व कृत्रिम रसायनांनी बनवलेले रंग हे राजसिक किंवा तामसिक असतात. असे रंग दिल्यामुळे अनेक वर्षे घराला रंग दिला जात नसेल आणि त्या घरातील कुटुंबीय अध्यात्मशास्त्रानुसार किंवा एखाद्या संतांच्या मार्गदर्शनानुसार साधना करत नसतील, तर त्या वास्तूच्या भिंतींवर सूक्ष्मातून त्रासदायक शक्तीचे आवरण येते.

गोबर लेपन केलेली भिंत

२. उपासना पिठाच्या आश्रमात शेण आणि माती यांच्या साहाय्याने रंगकाम केल्यावर सकारात्मक स्पंदने येऊन खोलीत शीतलता जाणवणे

उपासना पिठाच्या इंदूरच्या मानपूर क्षेत्रात असलेल्या आश्रमात एक नवीन प्रयोग करण्यात आला. तेथील सिमेंटने बनवलेल्या सर्व खोल्यांना शेण आणि माती यांच्या साहाय्याने रंगकाम करण्यात आले. आश्रमात गोशाळा असल्यामुळे रंग देण्याची ही पद्धत पुष्कळ स्वस्तात होते. असा रंग दिल्यानंतर येणारी स्पंदने सकारात्मक असून खोलीतही शीतलता जाणवते.

(क्रमश:)

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (३०.२.२०२२)