‘सनातनच्या तीनही गुरूंच्या तेजाने जणू ब्रह्मांड तेजोमय झाले आहे’, असे जाणवणे

सनातनच्या रामनाथी आश्रमातून मार्गस्थ होतांना श्रीविष्णुरूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले, त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (डावीकडे) आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (उजवीकडे)

१. रथोत्सवातील ७ घोड्यांचा रथ पाहून ‘साक्षात् सूर्यनारायणाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी रथ दिला आहे’, असे मला जाणवले.

२. ‘सनातनच्या तीन गुरु डोळ्यांच्या कक्षेत न मावणे : रथात विराजमान झालेले परात्पर गुरु डॉ. आठवले सूर्यासम तेजस्वी दिसत होते. त्यांच्या उजव्या बाजला बसलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि डाव्या बाजूला बसलेल्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ याही तेजःपुंज दिसत होत्या. ‘त्या तिघांच्या तेजाने जणू ब्रह्मांडच तेजोमय झाले आहे’, असे मला जाणवले. तीनही महान विभूती माझ्या डोळ्यांच्या कक्षेत मावत नव्हत्या.

सौ. दीपा औंधकर

३. रथोत्सवात ध्वज घेऊन चालत असतांना ‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरच होणार आहे’, असे वाटणे : रथोत्सवाची सांगता होत असतांना आम्ही रामनाथी आश्रमातील मुख्य फाटकातून वर जात होतो. त्या वेळी ‘सर्व साधक ध्वज घेऊन हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी मला ‘सनातन पंचांगा’तील साधक ध्वज घेऊन चढत असल्याचे चित्र आठवले आणि ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी चित्राच्या माध्यमातून आधीच हे दृश्य दाखवले होते’, याची मला जाणीव झाली. तेव्हा मला वाटले, ‘देवाने सूक्ष्मातून हिंदु राष्ट्राची स्थापना केली आहे. आता ते स्थुलातून स्थापन करायचे शेष असून त्याची स्थापना लवकरच होणार आहे.’

४. संपूर्ण रथोत्सवात माझा भाव जागृत होऊनही माझ्या डोळ्यांतून अश्रू आले नाहीत; पण मला आनंद अनुभवता येत होता. त्या वेळी ‘गुरुदेवांनी अव्यक्त भाव अनुभवण्याची संधी दिली’, असे मला वाटले.

५. रथोत्सवात चालत असतांना ‘पावलोपावली माझे अनेक जन्मांचे प्रारब्ध नष्ट झाले’, असे मला जाणवले.

‘हे श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवा, ‘तुमच्या अपार कृपेने मला तुम्ही विराजमान असलेल्या रथोत्सवात सहभागी होता आले. याबद्दल तुमच्या ब्रह्मांडव्यापी श्री चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे.’

– सौ. दीपा अमित औंधकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.५.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक