आझमगड (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या पाद्य्राला अटक

आझमगड – येथील कुआन गावात हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या मोरल नावाच्या पाद्य्राला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपीच्या घरातून धार्मिक ग्रंथ, करारनामा आणि इतर धार्मिक साहित्य जप्त केले.

कुआन गावात मोरल याच्या घरात बर्‍याच दिवसांपासून धर्मांतराचे कार्य चालू होते. पोलिसांनी हिंदू जागरण मंचच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पाद्य्राच्या घरावर धाड घातली. तेथे मोठ्या संख्येने हिंदू उपस्थित होते. हे लोक धार्मिक ग्रंथ हातात घेऊन प्रार्थना करत होते. या प्रकरणी पोलिसांनी पाद्य्रासह इतर काही जणांना कह्यात घेतले आहे असून त्यांच्याविरुद्ध धर्मांतर कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. आझमगडमध्ये अनेक ठिकाणी धर्मांतराचे कार्यक्रम चालू असल्याचे हिंदू जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

  • देशभरात हिंदूंची करण्यात येणारे धर्मांतर रोखण्यासाठी भाजप सरकारने राष्ट्रीय पातळीवर धर्मांतरबंदी कायदा करून त्याची कठोर कार्यवाही केली पाहिजे !
  • हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी ‘त्यांना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यात धर्माभिमान निर्माण करणे’, हाच एकमेव आणि प्रभावी उपाय आहे !