पुणे – सारस्वत सहकारी बँक आणि गुजरातमधील मेहसाना सहकारी बँक यांनी रूपी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या विलिनीकरणासाठी प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने ठेवीदारांची पूर्ण रक्कम मिळण्याच्या दृष्टीने पावले उचलून तातडीने विलिनीकरण करावे, अशी मागणीही रूपी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदार हक्क समितीने पत्रकार परिषदेत केली. रूपी बँकेच्या ५ लाख ठेवीदारांचे अनुमाने १ सहस्र ३०० कोटी रुपये बँकेत अडकून आहेत. नुकत्याच झालेल्या बँकिंग नियमन कायदा मधील सुधारणांमुळे रिझर्व्ह बँकेला सहकारी बँकांवर पूर्ण नियंत्रण मिळाले आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने सर्वच ठेवीदारांचे संरक्षण केले पाहिजे, अशी मागणीही समितीने केली.