१. दशहरा
‘दसरा’ या शब्दाची फोड ‘दस + हरा’. दसर्याला उत्तर हिंदुस्थानात ‘दशहरा’ असे म्हणतात. ‘हरणे’ म्हणजे घेऊन जाणे. दशहरा म्हणजे ‘माझे दहा अवगुण घेऊन जा.’
२. दुर्गापूजा (नवरात्री) उत्सव साजरा करण्यासंबंधी कालिका पुराणात सांगितलेले पर्याय
अ. भाद्रपद कृष्ण पक्ष नवमीपासून आश्विन शुद्ध पक्ष नवमीपर्यंत करावा.
आ. आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून नऊ दिवस करावा.
इ. आश्विन मासातील शुक्ल पक्ष सप्तमीपासून तीन दिवस करावा.
ई. आश्विन मासातील शुक्ल पक्ष अष्टमीपासून दोन दिवस करावा.
उ. न्यूनतम आश्विन शुक्ल पक्ष नवमी या दिवशी एक दिवस तरी करावा.
३. दुर्गापूजा उत्सवाचा प्रचार आणि लोकप्रियता
बंगाल, बिहार, ओरिसा, आसाम, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या प्रदेशांमध्ये दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यातल्या त्यात बंगालमध्ये त्याचा प्रचार आणि लोकप्रियता विशेष आहे. बंगाली लोकांचा तो वर्षातील प्रमुख सणच आहे.’
(मासिक ‘मनशक्ती’, ऑक्टोबर २००७)