सप्तर्षींच्या आज्ञेने गुरुपौर्णिमेनिमित्त बनवण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्राची ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

सप्तर्षींच्या आज्ञेने वर्ष २०२१ च्या गुरुपौर्णिमेनिमित्त बनवण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्राची ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

सौ. मधुरा कर्वे

१. गुरुपौर्णिमेनिमित्त बनवलेल्या चित्रामध्ये आरंभीही पुष्कळ प्रमाणात चैतन्य असणे; परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी चित्राला हस्तस्पर्श केल्यानंतर त्यातील चैतन्यात आणखी वाढ होणे : ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हे अध्यात्मातील तत्त्व आहे. यानुसार वर्ष २०२१ च्या गुरुपौर्णिमेनिमित्त बनवलेल्या चित्रात श्रीराम, श्रीकृष्ण आणि तिन्ही गुरूंचे तत्त्व (चैतन्य) एकवटले आहे. (हे चित्र पृष्ठ १ वर प्रसिद्ध करण्यात आले आहे.) यामुळे आरंभीही (परात्पर गुरु डॉक्टरांनी चित्राला हस्तस्पर्श करण्यापूर्वी) चित्रामध्ये (२९२ मीटर) पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यमय हस्तस्पर्शाने चित्रातील चैतन्यात आणखी वाढ होऊन चित्राच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ४३४.५० मीटर झाली.

२. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त बनवलेल्या चित्राचे भावपूर्ण षोडशोपचार पूजन केल्याने त्यातील देवतातत्त्वे जागृत होणे : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी गुरुपौर्णिमेला या वैशिष्ट्यपूर्ण चित्राचे षोडशोपचार पूजन अत्यंत भावपूर्ण केले. त्यांनी आपत्काळात सर्व साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी परात्पर गुरुदेवांना आर्ततेने प्रार्थना केली. यांमुळे चित्रातील देवतातत्त्वे जागृत होऊन साधकांच्या रक्षणासाठी कार्यरत झाली. गुरुपूजनानंतर चित्राच्या सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ होऊन तिची प्रभावळ ६०३ मीटर झाली.’

– सौ. मधुरा कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२६.७.२०२१)

ई-मेल : [email protected]