परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना महर्षींनी दिलेले वचन

१. तीनही गुरूंवर श्रद्धा असलेल्या साधकांना आम्ही काही अल्प पडू देणार नाही !

कैलास यात्रेला जातांना मनुष्याला वाट माहिती नसेल, तर आम्ही महर्षि एखाद्या मनुष्याच्या रूपात येऊन त्याला वाट दाखवतो. गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले), उत्तरापुत्री (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ) आणि कार्तिकपुत्री (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) या तिघांवर श्रद्धा असलेल्या भक्तांना आम्ही अध्यात्मपथावर मार्गदर्शन करणार आहोत. या लोकात आणि परलोकातही आम्ही त्यांना सोडणार नाही. आम्ही अशा साधकांची फुलांप्रमाणे काळजी घेऊ. तो साधक कोणत्याही पंथात, प्रांतात किंवा देशात जन्मला असो, आम्ही त्याची काळजी घेऊ. ब्रह्मांडात जोपर्यंत शिव, सूर्य आणि नारायण हे तिघे आहेत, तोपर्यंत या तीनही गुरूंवर विश्वास ठेवणार्‍या साधकांना आम्ही काही अल्प पडू देणार नाही.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

२. तीनही गुरु जातांना सर्व कीर्ती साधकांना देऊन जाणार !

देवाने गायीच्या दुधात किडे पडू नयेत; म्हणून दुधाला ‘फेस’ दिला. फेसामुळे दुधाचे किड्यांपासून रक्षण होते. तसे आम्ही महर्षि साधकांचे संरक्षककवच बनून रहाणार आहोत. गुरूंसाठी पृथ्वीवर आलेल्या साधकांकडे महर्षींचे दिवस-रात्र लक्ष आहे. हे तीनही गुरु जातांना त्यांची सर्व कीर्ती आपल्या साधकांना देऊन जाणार आहेत.

३. गुरु आणि त्यांच्यासाठी आलेल्या उत्तरापुत्री अन् कार्तिकपुत्री यांची कीर्ती करण्याची वेळ आलेली असणे !

श्रीमन्नारायणाने आम्हाला लिहायला सांगितले ते असे, ‘जसे ‘श्रीमन्नारायण’ हे नाव या जगात अजरामर झाले आहे, तसेच माझ्या अंश रूपाचे ‘श्रीजयंत’ हे नाव अजरामर रहायला हवे. ब्रह्मांडात शिव, सूर्य आणि नारायण आहेत, तोपर्यंत ‘श्रीजयंत’ हे नाव रहाणार आहे.’ श्रीमन्नारायणाने सांगितले आणि आम्ही लिहिले. आता गुरु आणि त्यांच्यासाठी आलेल्या उत्तरापुत्री अन् कार्तिकपुत्री यांची कीर्ती करण्याची वेळ आलेली आहे.’

– महर्षि, सप्तर्षि जीवनाडी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून), चेन्नई (१.११.२०१६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक