‘हे मृत्युंजय, महाकाल, या आपत्काळात (तिसरे महायुद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे प्रतिकूल ठरणार्या काळात) रज-तमाचा नाश करून तू सत्-चित्-आनंद स्वरूपातील सनातन धर्माची स्थापना करणार आहेस. या तुझ्या शिवसंकल्पासाठी कोटीशः कृतज्ञता !
१. अधर्मियांची हिंदु धर्मावरील आक्रमणे
१ अ. धर्मांधांनी स्थुलातून आक्रमणे करून हिंदूंच्या मनात भीती निर्माण करणे : धर्म हा हिंदूंचा प्राण असल्याने आक्रमकांनी धर्महनन करून हिंदूंना हतबल, म्हणजे बलहीन केले. यवनांनी हिंदूंचे छळाबळाने धर्मांतर केले. हिंदूंच्या मनात दहशत आणि भीती यांचे वातावरण निर्माण होण्यासाठी ज्यांनी धर्मांतराला विरोध केला, त्यांच्यावर स्थुलातून धारदार शस्त्रांनी आक्रमण केले. हिंदूंची कातडी सोलली, त्यांना जिवंत जाळले, त्यांना अर्धवट मारून खोल विहिरीत फेकले, त्यांचा एक-एक अवयव तोडून हाल हाल करून त्यांची अमानुष कत्तल केली. त्यांची संपत्ती, भूमी, स्त्रिया, घरदार सर्वच लुबाडले.
१ आ. हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे : आक्रमकांनी चैतन्याचे स्रोत असलेली सहस्रो मंदिरे आणि त्यांतील देवतांच्या सुंदर मूर्तींची तोडफोड केली. त्यांनी त्या ठिकाणी मशिदी उभारल्या.
१ इ. लव्ह जिहाद अन् भूमी (लॅण्ड) जिहाद करून हिंदूंच्या मुलींचे आणि हिंदूंचे जीवन उद्ध्वस्त करणे
१. आक्रमकांनी लव्ह जिहाद करून हिंदूंच्या मुलींचे जीवन उद्ध्वस्त केले.
२. आक्रमकांनी भूमी (लॅण्ड) जिहाद करून भूमी बळकावली. त्यांनी कित्येक गुरुकुले उद्ध्वस्त केली.
३. आक्रमकांनी हिंदूंना दरडोई जिझिया कर लावला.
१ ई. अध्यात्मावरील ग्रंथसंपदा आणि नालंदासारखी ज्ञानपिठे यांची जाळपोळ करणे : सार्या मानवजातीला आत्मज्ञान करून देणारी अध्यात्मावरील ग्रंथसंपदा आणि विविध विद्या अन् कला या विषयांचे ज्ञान प्र्राप्त करून देणारी ग्रंथसंपदा असलेली नालंदासारखी ज्ञानपिठे या क्रूर आक्रमकांनी जाळली. हे ज्ञानग्रंथ कित्येक मास जळत शेवटी भस्मीभूत झाले. अशा प्रकारे मानवतेच्या मारेकर्यांनी पृथ्वीवरील मानवजातीचा घोर अपराध केला आहे. केवढे हे क्रौर्य !
२. ख्रिस्त्यांनी हिंदूंवर केलेल्या वैचारिक आक्रमणांचा परिणाम
२ अ. ख्रिस्ती लोकांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणांतून जन्माने हिंदु आणि आचरणाने ख्रिस्ती अशा ‘जन्महिंदूं’ची निर्मिती होणे : ख्रिस्त्यांनी हिंदूंची बलस्थाने नष्ट केली आणि हिंदूंचा बुद्धीभेद (‘ब्रेनवॉश’) करून त्यांना भ्रमित केले. त्यांनी हिंदूंचे मन आणि बुद्धी यांवर इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून असे संस्कार केले की, ‘इंग्रजांचे सर्वच चांगले, उत्कृष्ट आणि अनुकरणीय’, तर ‘हिंदूंचे कालबाह्य अन् निकृष्ट’ म्हणून टाकाऊ ठरले. हिंदूंमध्ये आपला धर्म, संस्कृृती, वर्णाश्रम आणि परंपरा यांसंदर्भात न्यूनगंड निर्माण करण्यात अन् पाश्चिमात्य संस्कृतीची आवड उत्पन्न करण्यात मेकॉलेची शिक्षणपद्धत यशस्वी ठरली. अशा प्रकारे जन्माने हिंदु आणि आचरणाने ख्रिस्ती अशा ‘जन्महिंदूं’ची निर्मिती झाली.
२ आ. गुरुकुले बंद पाडून त्या जागी इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडणे : ५०० वर्षांपूर्वी भारतात अनुमाने ७ लक्ष गुरुकुले होती आणि १७ हून अधिक ज्ञानपिठे होती. व्यावहारिक आणि पारमार्थिक अशा सर्वच विषयांचे तात्त्विक अन् प्रायोगिक ज्ञान या गुरुकुलांतून मिळत असे. ‘नीतीवान, धर्मसंपन्न, कष्टाळू, त्यागी, कौशल्यवान अशी तरुणपिढी घडवणारी ही गुरुकुले, आचारसंपन्न गुरु आणि ज्ञानसंपन्न देवभाषा संस्कृत ही भारताची बलस्थाने आहेत’, हे जेव्हा लक्षात आले, तेव्हा ख्रिस्त्यांनी गुरुकुले बंद पाडून गुरूंना सनातनी (जुनाट) आणि संस्कृतला मृत भाषा ठरवले अन् ‘मेकॉलेप्रणित’ इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडल्या.
२ इ. बारा बलुतेदार पद्धत नष्ट करून औद्योगिकरणाने गजबजलेली शहरे निर्माण करणे : पूर्वी भारतातील प्राचीन खेडी स्वायत्त आणि स्वयंपूर्ण होती. गावात पैशापेक्षा प्रेमाला अधिक महत्त्व होते. पूर्वी गावात १२ बलुतेदार असायचे – सोनार, गुरव, नाभिक, परीट, कुंभार, सुतार, लोहार, चांभार, कोळी, चौगुला (गावाच्या सुरक्षेचे दायित्व घेणारे), मांग आणि महार. गावातील शेतकरी या लोकांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यात धान्य देत असत. पैशाचे व्यवहार बहुधा नसत. सगळे व्यवहार वस्तूविनिमयाद्वारे होत असत.
प्रत्येकाचा स्वतःचा धंदा, उद्योग-व्यवसाय होता. भारतियांनी कधी नोकरी केली नाही. ‘पैसा मिळवणे’ हे त्यांचे उद्दिष्टच नव्हते. समाजाच्या निकडी भागवण्यासाठी व्यवसायाच्या माध्यमातून योगदान देणे, यावरच त्यांचा भर होता. इंग्रजांनी भारतियांना नोकर बनवले, त्यांना पैशाचे आमीष दाखवले आणि औद्योगीकरण करून गजबजलेली शहरे निर्माण केली. या प्रक्रियेत खेडी उद्ध्वस्त झाली.
२ ई. कुटुंबव्यवस्था मोडकळीस येणे : इंग्रजी शिक्षणामुळे अर्थ आणि काम हे पुरुषार्थ बळावले. विलासी अन् व्यापारी वृत्ती वाढली. ‘मी, माझे आणि माझ्यासाठी’, अशी संकुचित वृत्ती निर्माण झाली.
त्यामुळे भारतीय व्यक्तीस्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानता या नावाने विहार करू लागले. समष्टीचे विस्मरण झाले. एकत्र कुटुंबासाठी आवश्यक असलेला त्याग, प्रीती आणि व्यापकत्व या संकुचित वृत्तीला पेलवले नाही. नोकरीच्या निमित्ताने प्रत्येकाने आपापले बिर्हाड थाटले. जीवनातील आनंद निघून गेला. अशा प्रकारे मोठमोठी कुटुंबे उद्ध्वस्त झाली.
२ उ. पितृसत्ताक पद्धत मोडकळीस आल्याने जन्महिंदूंची निर्मिती होणे : औद्योगिकरणामुळे शहरे निर्माण झाली. गावे ओस पडू लागली. नोकरी अन् शिक्षण यांसाठी मुले-बाळे शहरात गेल्यामुळे मोठमोठी कुटुंबे नाहीशी होऊन हळूहळू पितृसत्ताक पद्धती बाजूला सारली गेली. याचा लाभ घेऊन समाजवाद, विज्ञानवाद, बुद्धीवाद, असे नाना वाद डोके वर काढून मिरवू लागले; मात्र या सर्व वादांनी हिंदूंच्या जीवनातील आनंद, चैतन्य, प्रीती, समाधान आणि शांती हरवली. अशा प्रकारे मागासलेला समाज आणि ‘आम्ही ‘सुधारलेले’ असे समजणारा, इंग्रजाळलेला, विज्ञाननिष्ठ, बुद्धीवादी, नास्तिक, समाजवादी, असा हिंदूंचा एक गट निर्माण झाला. अशा प्रकारे हिंदु कुटुंबात जन्मलेल्या; परंतु हिंदुत्व हरवलेल्या हिंदूंची, म्हणजे जन्महिंदूंची निर्मिती झाली.
३. जन्महिंदूंची निर्मिती झाल्याने झालेले परिणाम
अ. धर्मशिक्षण बंद पडल्यामुळे धर्मनिष्ठा कोलमडली.
आ. साधना करणे बंद झाल्यामुळे बुद्धी भ्रष्ट झाली.
इ. सत् आणि असत् असा भेद दाखवणारी विवेकबुद्धी नष्ट झाली.
ई. ईश्वराचे अनुसंधान राहिले नाही.
उ. सत्याचे आकलन न होऊन सूक्ष्मातून ज्ञान मिळेनासे झाले.
ऊ. शत्रूंच्या कारवाया, त्यांची चाल (कपट, कारस्थाने, धूर्तपणा) लक्षात न आल्याने शत्रूच मित्र वाटू लागले.
ए. मित्रांना शत्रूसमान वागणूक देण्यात येऊ लागली.
ऐ. हिंदु धर्मबांधवांना हीन लेखून त्यांचा अनादर करू लागले.
४. जन्महिंदूंनी कर्महिंदू होण्यासाठी आचरणात आणावयाच्या गोष्टी
अ. हिंदूंनी आपल्या धर्माचा अभ्यास करून त्याची बलस्थाने जाणून घ्यावीत.
आ. धर्माचे महत्त्व, श्रेष्ठत्व आणि अनिवार्यता समजून घ्यावी.
इ. ‘चार पुरुषार्थांमधे धर्माला प्रथम स्थान आहे’, हे सूत्र लक्षात घ्यायला हवे.
ई. धर्मतत्त्वे जाणून घेऊन, म्हणजे खरे साधकत्व किंवा हिंदुत्व स्वतःच्या अंतर्मनात बिंबण्यासाठी साधना करायला हवी.
उ. धर्माचे ज्ञान असणारे संत, सद्गुरु किंवा परात्पर गुरु यांच्या सान्निध्यात राहून धर्मशिक्षण घ्यायला हवे.
५. कर्महिंदूंची गुणवैशिष्ट्ये
अ. ईश्वरप्राप्ती हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय असून पैसा किंवा सत्ता नाही, याचे ज्ञान झालेला, तसेच धर्माचे, म्हणजेच ईश्वराचे आणि त्याच्या कृपेचे महत्त्व ज्याने जाणले, तोच हिंदू आहे.
आ. श्रद्धावान जिवाची ईश्वरप्राप्तीची तळमळ पाहून, तसेच स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन यांसाठी त्याने केलेले प्रयत्न अन् त्याची कठोर साधना पाहून ईश्वरच गुरुरूपात त्याच्या साहाय्यासाठी धाव घेतो आणि त्याला दोषमुक्त करून त्याला ईश्वरी गुणांची (निरपेक्ष प्रीती, त्याग, व्यापकत्व, आज्ञापालन, सेवाभाव, कृतज्ञता, नम्रता, सत्यनिष्ठा इत्यादींची) प्राप्ती करून देतो.
इ. असत्याने कितीही मोहक रूप धारण केले, तरी तो त्याला बळी पडत नाही; कारण अंतर्मनातून श्री गुरु त्याला सतत मार्गदर्शन करत असतात आणि योग्य आचरण करायला बळही देतात.
ई. खरा हिंदू (म्हणजे साधना करणारा साधक) व्यक्ती, समाज, निसर्ग आणि ईश्वर या सर्वांवर निरपेक्ष प्रेम करतो. अखिल ब्रह्मांडात त्याला श्री गुरूंचे दर्शन घडते. त्यामुळे सर्वांमध्ये सामंजस्य असते. प्रीतीच्या धाग्यांनी तो सर्वांशी जोडला जातो आणि तो स्वतःच ब्रह्मांडव्यापक होतो. हेच हिंदुत्व आणि हीच आनंदप्राप्ती ! आनंद हा केवळ ईश्वराचा गुण आहे आणि हिंदुत्व (रज-तम गुणांचा त्याग) ही आनंदप्राप्तीसाठी पात्रता आहे.
६. आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी धर्माचे महत्त्व
‘ईश्वराच्या संकल्पाने ब्रह्मांडाची निर्मिती होते. ईश्वराच्या कृपेने धर्मामुळे (धर्म हे ईश्वराचे एक नाव आहे.) धारणा (पालन, पोषण आणि रक्षण) होते आणि ईश्वरेच्छेनेच ब्रह्मांडाचा नाश होतो’, हे सूत्र लक्षात घेतले, तर ‘धर्मच आपले अस्तित्व आहे’, हे सूत्र कळते, उदा. गोडी हा साखरेचा गुणधर्म आहे. गोडीच नष्ट झाली, तर त्या पदार्थाला ‘साखर’ हे नावच रहाणार नाही.
७. भारतियांना गुरुकृपेने लाभलेली कल्याणप्रद संधी
भारतासारख्या पुण्यभूमीत आणि हिंदु कुटुंबात आपला जन्म होणे, याहून अधिक भाग्य ते कोणते ? ‘याच भूमीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपात श्रीविष्णूने अवतार घेतला आहे. त्यांच्या साहाय्याला आध्यात्मिक उत्तराधिकारी बनून महालक्ष्मीदेवीने भूदेवीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीदेवीस्वरूप श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या रूपात अवतार घेतला आहे’, असे महर्षींनी नाडीभविष्याच्या आधारे सांगितले आहे. अशा प्रकारे श्रीमन्नारायणाने धर्मसंस्थापनेचे कार्य आरंभले आहे. त्यासाठी त्याने स्थापन केलेली ‘सनातन संस्था’ ही आध्यात्मिक संस्था कार्यरत झाली आहे. माणसाला चांगला साधक बनवणारी, जन्महिंदूंना कर्महिंदू बनवणारी, जिवासाठी आनंदप्राप्ती आणि समाजासाठी ‘हिंदु राष्ट्राची निर्मिती’ हेे ध्येय ठेवणारी ही कार्यशाळाच आहे. येथे ९० टक्के प्रायोगिक ज्ञान मिळते. सनातनच्या या ३ गुरूंच्या रूपात दत्तगुरूच आपल्याला या आपत्काळात तारून नेणार आहेत. ही आपल्यासाठी मोठी गुरुकृपाच आहे. अन्य पंथांतील लोक स्वतःहून हिंदु धर्म स्वीकारून साधना करत आहेत. धर्मांतरितांनी घरवापसी करून आणि जन्महिंदूंनी कर्महिंदू बनून या युगपरिवर्तनाचा लाभ करून घेण्यातच आपले आणि विश्वाचे कल्याण होणार आहे.
८. भूतकाळातील चुकांमधून शिकून पुढे जाऊया !
‘धर्म हे आपले बलस्थान आहे’, हे सूत्र आपण विसरलो. आपण धर्म सोडून अर्थ आणि काम यांच्या मागे धावलो. अन्य पंथियांच्या भूल-थापांना बळी पडलो. त्यामुळे अधोगतीला लागून दारुण दुःख, दैन्य आणि दारिद्य्र अशा दुर्भाग्याचे वाटेकरी झालो. कोरोना महामारीच्या वैश्विक संकटात आपण पुष्कळ काही शिकलो आहोत. आपल्या चुकांतून शिकायची, हीच वेळ आहे. देवाने आपल्याला ही संधी दिली आहे. भारतियांनो, ‘आपत्काळात धर्म आणि साधना यांच्या बळावरच आपले रक्षण होणार आहे’, हे सत्य जाणा आणि साधनेने आत्मबळ मिळण्यासाठी अन् गुरुकृपा होण्यासाठी ईश्वराचे निस्सीम भक्त व्हा ! जिवंत रहाण्यासाठी हाच एक उपाय आहे.
गुरुचरणी शरणागत,
– सौ शालिनी मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.११.२०२०)