सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपायांच्या संदर्भात साधकाला केलेले अनमोल मार्गदर्शन

sadguru_mukul_gadgil_
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

१. ‘नामजपादी उपाय करतांना लढाऊ वृत्ती हवी आणि ते चिकाटीने करायला हवेत. उपाय करतांना केवळ नामजप करत न रहाता नामजपासह शरिरावर आलेले आवरणही काढावे.

२. ‘प्राणशक्तीवहन’ पद्धतीनुसार उपाय शोधणे’, हे लढाऊ वृत्तीने करायला हवे, तरच परिणामकारक उपाय होतात आणि उपायांची फलनिष्पत्ती वाढते.

३. सर्वांत अधिक त्रासदायक (काळी) शक्ती पोटातील पोकळीमध्ये साठलेली असते. हाताने शरिरातील त्रासदायक शक्ती खालून वर या पद्धतीने काढायला हवी. त्यामुळे पोटातील त्रासदायक शक्ती डोळे आणि तोंड यांच्या माध्यमांतून बाहेर पडते. त्या वेळी ‘ढेकरा आणि जांभया येणे’, यांचे प्रमाण अधिक असते.

श्री. शंकर नरुटे

४. डोळ्यांतून त्रासदायक शक्ती अधिक वेळ काढावी. डोळ्यांतील त्रासदायक शक्ती काढल्यानंतर हळूहळू पोटातील त्रासदायक शक्ती न्यून होते.

५. पूर्ण शरीर हलके वाटेपर्यंत आवरण काढत रहावे. एकदा शरिरातील आवरण काढले की, ४ – ५ घंटे आपली सेवा परिणामकारक आणि गतीने होते.

६. अल्प वेळेत अधिक फलनिष्पत्ती मिळवण्यासाठी चिकाटीने आणि तळमळीने उपाय शोधायला हवेत.

७. आपण उपाय करण्यात सातत्य ठेवल्यास त्रास न्यून होऊन आपल्याला लवकरात लवकर भगवंताशी एकरूप होता येते.

वरील सूत्रांचे महत्त्व लक्षात घेऊन परिणामकारक उपाय करूया.’

– श्री. शंकर नरुटे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.९.२०२०)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.