आक्षेपार्ह मजकूर नसल्याने बजरंग दलाच्या फेसबूक खात्यावर बंदीची आवश्यकता नाही ! – फेसबूक इंडिया

फेसबूक इंडियाचे प्रमुख अजित मोहन काँग्रेसचे नेते शशी थरूर

नवी देहली – तथ्यशोधक गटाला बजरंग दलाच्या फेसबूकच्या खात्यावर कोणतेही आक्षेपार्ह लिखाण किंवा सामग्री आढळलेली नाही. त्यामुळे त्याच्या फेसबूक खात्यावर बंदी घालण्याची आवश्यकता नाही, असे ‘फेसबूक इंडिया’कडून सांगण्यात आले. फेसबूक इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील माहिती तंत्रज्ञान संबंधी संसदेच्या स्थायी समितीसमोर उपस्थित होऊन ही माहिती दिली. समितीने त्यांना नागरिकांची माहिती (डाटा) सुरक्षेच्या सूत्रावर पाचारण केले होते. फेसबूककडून ‘बजरंग दला’चा समावेश ‘धोकादायक’ संघटनेत करण्यास नकार दिल्याचे वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाले होते.

१. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शशी थरुर यांच्यासमवेत काँग्रेसचे नेते कार्ती चिदंबरम् उपस्थित होते. त्यांनी अजित मोहन यांच्याकडे बजरंग दलावर बंदीशी निगडीत वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्ताविषयी प्रश्‍न विचारले.

२. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी, ‘बजरंग दलाविषयी वॉल स्ट्रीट जर्नलचे वृत्त चुकीचे असेल, तर ‘फेसबूक’कडून हे वृत्त खोटे असल्याचे का घोषित करण्यात आले नाही ?’, असा प्रश्‍न विचारला.