गांधीवादी विचारसरणीचा त्याग केल्याने भारतीय क्रिकेट संघ यशाच्या शिखरावर !- ग्रेग चॅपेल, माजी क्रिकेटपटू, ऑस्ट्रेलिया

गांधीवादी विचारसरणी कालबाह्य ठरवणारे ग्रेग चॅपेल यांचे वक्तव्य

ग्रेग चॅपेल

यापूर्वीचे भारतीय क्रिकेट संघ आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या विरुद्ध केवळ बचावात्मक खेळावरच भर देत असत. ही विचारसरणी भारताचे म. गांधी यांना अनुसरून होती. हा दृष्टीकोन पालटणारा सौरभ गांगुली हा पहिला कर्णधार ठरला. या विचारसरणीला शिखरावर नेण्यात विराट कोहलीचा वाटा सिंहाचा राहिला.

– ग्रेग चॅपेल, माजी क्रिकेटपटू, ऑस्ट्रेलिया.

भारताच्या शासनकर्त्यांनीही गांधींच्या विचारसरणीचा त्याग करून आक्रमक पवित्रा घेतला, तर भारतीय क्रिकेट संघाप्रमाणेच भारत देशही यशाच्या शिखरावर पोचेल !

(संदर्भ : दैनिक तरुण भारत, गोवा, १२.१२.२०२०)