बिहारमधील एम्.आय.एम्.च्या धर्मांध आमदाराचा शपथ घेतांना ‘हिंदुस्थान’ म्हणण्यास नकार !

आमदाराने घेतली उर्दूतून शपथ !

  • बिहारमध्ये पहिल्यांदाच एम्.आय.एम्.चे ५ आमदार निवडून आले आहेत आणि ते आता त्यांचे खरे स्वरूप विधानसभेत पहिल्याच दिवसापासून दाखवू लागले आहेत. पुढील ५ वर्षांत ते काय करणार, याची ही झलक आहे. हिंदू आतातरी शहाणे होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील होतील का ?
  • किती हिंदु मातृभाषेतून किंवा देवभाषा संस्कृतमधून शपथ घेतात ?
आमदार अख्तरुल इमान

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारच्या नवनिर्वाचित विधानसभेतील आमदारांचा शपथविधी २३ नोव्हेंबरपासून प्रारंभ करण्यात आला आहे. या वेळी एम्.आय.एम्.चे आमदार अख्तरुल इमान यांनी शपथ घेतांना ‘हिंदुस्थान’ शब्दाला आक्षेप घेत ‘भारत’ असा उच्चार केला.

त्यांनी हंगामी विधानसभा अध्यक्ष जीतनराम मांझी यांच्याकडे ‘भारत’ शब्द वापरण्याची अनुमती मागितली. या वेळी इमान म्हणाले, ‘‘मी भारताच्या राज्यघटनेची शपथ घेऊ इच्छितो, हिंदुस्थानच्या राज्यघटनेची नाही.’’ नंतर त्यानी ‘उर्दू भाषेत शपथ घेणार’, असे सांगितल्यावर त्यांना उर्दूमधून शपथ देण्यात आली.