नरकचतुर्दशीच्या दिवशी करतो श्रीकृष्णाचा विजयोत्सव साजरा ।

नामजप मला भवसागरातून पार करतो ।
दैनंदिनीचे लिखाण दिनचर्येचा अभ्यास करवते ।
प्रार्थना, कृतज्ञता ईश्‍वराशी अनुसंधान साधते ।
आत्मचैतन्यावरील अज्ञानाचे आवरण दूर करणारे ।
ते दैनिक ‘सनातन प्रभात’ आहे ॥ १ ॥

घोर आपत्काळात रक्षण होण्यासवे ।
श्रीकृष्णाची चित्ररूपी कवच-कुंडले दिली आहेत ।
जन्मोजन्मीचे स्वभावदोष-अहं घालवण्या ।
शिकवली आहे प्रक्रिया अपार कष्टातूनी ॥ २ ॥

तन-मन-धनाचा त्याग करून सेवा करावी ।
‘सत्यम् शिवं सुंदरम्’ अशी शिकवण असे तुझी ।
पण मी मनाची गुलाम आहे मन मला म्हणते ।
तू या शिकवणीला बळी पडू नकोस ॥ ३ ॥

नरकचतुर्दशीच्या दिनी श्रीकृष्णाने मुक्त केल्या ।
१६ सहस्र उपवर कन्या नरकासुराच्या गुलामीतून ।
श्री गुरुच करतील मुक्त मला मनाच्या गुलामीतून ॥ ४ ॥

नरकचतुर्दशीच्या दिवशी करतो श्रीकृष्णाचा विजयोत्सव साजरा ।
शरण आले गुरुदेवा, षडरिपूरूपी असुरांवर ।
विजय मिळवण्या द्यावा वर आम्हाला ॥ ५ ॥

– सौ. राजश्री देशमुख, सोलापूर (२७.१०.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक