जुना राजवाडा (कोल्हापूर) येथील ऐतिहासिक नगारखान्याला या वर्षी २५ फुटी साखरेची माळी नाही ! 

कोल्हापूर – हिंदु नववर्षाचे स्वागत गुढीपाडव्या दिवशी गुढी उभी करून, नव्या संकल्पना, संकल्प करून मोठ्या उत्साहात केले जाते. यंदा कोरोनामुळे बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी बत्ताशाची साखरमाळ, चाफ्याची फुले, फुलमाळा उपलब्ध न झाल्याने नागरिकांनी अत्यंत साधेपणाने गुढीपाडवा साजरा केला. कोल्हापूर येथील जुना राजवाडा येथील ऐतिहासिक नगारखान्याला गुढीपाडव्याच्या दिवशी प्रतीवर्षी २५ फुटांची साखरमाळ बांधण्याची परंपरा आहे. यंदा कोरोनाच्या संकटामुळे प्रथमच या नगारखान्याला बत्ताशाची साखरमाळ बांधण्यात आली नाही.