आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ! – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

आषाढी वारी नियोजन आढावा बैठकीत सूचना

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापूर – आषाढी वारीसाठी प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करावे. वारीमध्ये वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. पालखी मार्ग, धर्मपूरी विसावा, मांडवी येथील रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. नियोजन भवन येथे आषाढी वारी नियोजनाविषयी आढावा बैठकीत शंभरकर बोलत होते.

या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, निवासी जिल्हाधिकारी शमा पवार, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले की, प्रत्येक विभागाने नेमून दिलेली कामे तत्परतेने पार पाडावीत. स्वच्छता, शौचालय सुविधा, तसेच अन्य डागडुजीकडे लक्ष द्यावे.