श्री गणेशमूर्ती विसर्जन पंचगंगा नदीच्या वहात्या पाण्यात करण्यास आडकाठी आणू नये ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

ज्यांना श्री गणेशमूर्ती विसर्जन पंचगंगेत करायचे आहे त्यांना आडकाठी आणू नये. कुणावरही कुठे विसर्जन करावे, यासाठी सक्ती करू नये, असे निवेदन कोल्हापूर येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.

आयुक्तांनी ही उधळपट्टी तातडीने थांबवावी ! – विवेक वेलणकर, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेकडून फिरत्या विसर्जन हौदांसाठी १ कोटी ३५ लाख रुपयांचे वर्गीकरण करून निविदा प्रक्रिया काढण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

पंचगंगा नदीतच श्री गणेशमूर्ती विसर्जन करणार; प्रशासनाने विरोध केल्यास मूर्ती आहे त्याच ठिकाणी ठेवणार !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि गणेशोत्सव मंडळे यांची बैठक

प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या धर्मबाह्य संकल्पना न राबवता पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती द्यावी ! – हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

इचलकरंजी येथील समस्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, तसेच विविध संघटना यांनी पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या धर्मबाह्य संकल्पना न राबवता पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती द्यावी ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते हिंदु जनजागृती समिती

कोल्हापुरातही प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या धर्मबाह्य संकल्पना न राबवता पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती द्यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.

पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती द्या ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे निवेदन

पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती देण्यात यावी, या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने महापालिका उपायुक्त प्रदीप ठेंगल यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी श्री. गजानन महाजन गुरुजी, श्री. प्रसाद जाधव यांसह अन्य धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी अनुमती नाकारल्यास मनसे पद्धतीने आंदोलन !

अनेक संघटना, स्थानिक लोकप्रतिनिधी, गणेशभक्त हे निवेदनाद्वारे वारंवार आवाहन करूनही प्रशासन श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयी काहीच भूमिका घोषित करत नाही, हे अनाकलनीय आहे ! हिंदूंच्या सणांविषयीच प्रशासनाची नेहमी बोटचेपी भूमिका का ?

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती द्यावी !

प्रशासनाने इचलकरंजी येथे पंचगंगा नदीत घरगुती, तसेच सार्वजनिक गणेशोत्सवातील श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास अनुमती द्यावी, अशी आग्रही भूमिका गणेशोत्सव मंडळे आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी यांनी मांडली.

इचलकरंजी येथे पंचगंगा नदीतच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन होण्यासाठी आयुक्तांना भेटून निवेदन देण्याचा निर्णय !

गेली २ वर्षे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहापूर खाणीत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्या वेळी नागरिक आणि मंडळे यांनी प्रशासनास सहकार्य केले; मात्र मंडळे पंचगंगा नदीतच विसर्जनास आग्रही आहेत.

श्री गणेशमूर्तींची विटंबना होत असल्याने कृत्रिम हौद उभारण्यात येऊ नयेत !

जळगाव येथे समन्वय बैठकीत गणेशभक्तांची शासन-प्रशासन यांच्याकडे एकमुखाने मागणी !