आजपासून देशभरात कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्रारंभ

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी अनुमाने ३ लाख आरोग्य कर्मचार्‍यांना लस दिली जाईल. रुग्णालयांतील इतर वैद्यकीय सेवा बाधित होऊ नयेत, यासाठी जानेवारीत एकूण १० दिवसच लसीकरण होईल.

नॉर्वेमध्ये ‘फायझर’ची कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेल्यांपैकी १३ जणांचा मृत्यू

आतापर्यंत देशात ३३ सहस्र लोकांपैकी २९ लोकांवर लसीचे दुष्परिणाम दिसून आले आहेत. त्यांतील २३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात १३ जणांचा लसीमुळे मृत्यू झाल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

चीनची लस परिणामकारक नसल्याने ब्राझिलने भारताकडे मागितली कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस !

भारताकडे अनेक देशांनी भारत-निर्मित कोरोना लसींची मागणी केली आहे; मात्र सध्या लसींची निर्यात करण्यासंदर्भात कोणतेही धोरण ठरले नसल्याने भारताने ब्राझिलच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही.

पक्षातील सहकार्‍यांना विश्‍वासात घेऊन मुंडे यांच्याविषयी निर्णय घेऊ ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

धनंजय मुंडे यांनी एका महिलेवर अत्याचार केल्याचे आरोप गंभीर आहेत.-शरद पवार

राज्यातील ३५८ केंद्रांच्या माध्यमातून ३५ सहस्र आरोग्य कर्मचार्‍यांना लसीकरण करण्यात येणार ! – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लसींचा पुरवठा करण्यात आला असून त्यांच्या निर्देशनुसार सर्व जिल्ह्यांना लसींचे वाटप केले जात आहे.

सनातनचे पनवेल येथील साधक डॉ. दीपक जोशी ʻकोरोना योद्धाʼ पुरस्काराने सन्मानित

जगात हाहा:कार माजवणाऱ्या कोरोना महामारीच्या विरोधात समाजातील अनेक घटकांनी नि:स्वार्थपणे सेवा बजावली. या पार्श्वभूमीवर बेंगळुरू येथील ʻस्मृती साधनाʼ नावाच्या स्वयंसेवी संस्थेने अशा लोकांना ʻकोरोना योद्धाʼ पुरस्कार देऊन गौरविले आहे.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची बैठकीत चर्चा नाही

धनंजय मुंडे यांच्यावर होणारे आरोप गंभीर आहेत याविषयी चर्चा होत आहे.

राज्यात पाच दिवसांत १ सहस्र ८३९ पक्ष्यांचा मृत्यू

राज्यात गेल्या पाच दिवसांपासून १ सहस्र ८३९ पक्ष्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याचे पशूसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. मुंबई, दापोली, परभणी, लातूर येथील पक्ष्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’चा प्रादुर्भाव दिसून आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्य कोरोना लसीकरणासाठी सिद्ध

लसीकरणासाठी प्राधान्यक्रमाने गट ठरवण्यात आले असून पहिल्या गटात हेल्थ केअर वर्कर्सचा समावेश आहे.

‘बर्ड फ्लू’च्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेचे आवाहन

बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने मुंबईत पक्ष्यांचे मृत्यू झाल्यास पालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या १९१६ या साहाय्य क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.