भारतातील मुसलमानांनी अफगाणिस्तानातील तालिबानी सत्तेचे समर्थन करणे, हा चिंतेचा विषय ! – नसीरुद्दीन शाह, ज्येष्ठ अभिनेता

भारतातील इस्लाम कायम जगभरातील इस्लामपेक्षा वेगळा राहिला आहे. अल्लाने ती वेळ आणायला नको की, इस्लामचीही वेगळी ओळख निर्माण होईल.

(म्हणे) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतातील ‘तालिबानी’ !  

राष्ट्रीय जनता दलाचे नेते जगदानंद सिंह यांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला !

आम्ही तालिबानचे संरक्षक असून त्याच्यासाठी सर्वकाही केले ! – पाकच्या मंत्र्याची स्वीकृती

आतापर्यंत तालिबान जे नाकारत होता, तेच पाकच्या मंत्र्याने जाहीरपणे सांगितल्याने तालिबान यावर काय उत्तर देणार ? या समर्थनामुळे आता जागतिक समुदायाने पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करणे आवश्यक आहे !

मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा अफगाणिस्तानचा सर्वोच्च नेता ! – तालिबानची घोषणा

तालिबानने मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा याला त्यांचा सर्वोच्च नेता असल्याचे घोषित केले आहे. ‘टोलो न्यूज’च्या वृत्तानुसार, तालिबानने मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा याच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष देश चालवणार असल्याचे म्हटले आहे.

(म्हणे) ‘काश्मीर प्रश्‍नामध्ये तालिबान हस्तक्षेप करणार नाही !’ – तालिबान

तालिबानची मानसिकता, त्याचा इतिहास आणि पाकची असलेली फूस यांमुळे त्याच्या या बोलण्यावर कोण विश्‍वास ठेवणार ? स्वतःच्या पित्याला आणि भावाला ठार करणार्‍या मोगली मानसिकतेच्या जिहाद्यांवर विश्‍वास ठेवण्याचा मूर्खपणा भारत कधीही करणार नाही !

पंजशीर प्रांतावर आक्रमण करणार्‍या तालिबानचेच ३५० आतंकवादी ठार ! – नॉर्दर्न अलायन्सचा दावा

अफगाणिस्तानचा पंजशीर प्रांत कह्यात घेण्यासाठी तालिबानने खावक येथे केलेल्या आक्रमणामध्ये तालिबानचेच ३५० आतंकवादी ठार झाल्याचा, तसेच ४० आतंकवाद्यांना पकडल्याचा दावा नॉर्दर्न अलायन्सने (तालिबानच्या विरोधात स्थापन करण्यात आलेला ‘उत्तरी मित्रपक्ष’) केला आहे.

(म्हणे) ‘काश्मीरला इस्लामच्या शत्रूंपासून मुक्त करा !’ – अल् कायदाचे तालिबानला आवाहन  

आतंकवाद्यांना आणि त्यांच्या संघटनांना धर्म असतो अन् त्यामुळेच ते इस्लामसाठी एकत्र येतात, हे या आवाहनातून सिद्ध होते. अशा आतंकवाद्यांना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य !

अमेरिकेसाठी युद्ध संपले, भारतासाठी चालू !

अमेरिकेसाठी जरी हे युद्ध संपले असले, तरी भारतासाठी ते चालू झाले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. पाक आतंकवादाला खतपाणी घालणारा देश आहे, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पटवून देतादेता आपल्याला अनेक दशके लोटली, तेवढा वेळ चीनच्या संदर्भात मिळणार नाही..

तुर्कस्तान सीमेवर भिंत बांधतो; पण भारतावर पाकिस्तानमधून सतत आक्रमणे होत असतांना स्वातंत्र्यापासून आतापर्यंत ७४ वर्षांत एकाही सर्वपक्षीय शासनकर्त्याने भिंत बांधली नाही ! म्हणजे राजकीय पक्षांना मते मिळवण्यासाठी पाककडून भारतावर आक्रमण हवे आहे का ?

अफगाणी नागरिक इराणमार्गे तुर्कस्तानात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी तुर्कस्तान इराणच्या सीमेवर २९५ किलोमीटर लांब आणि ३ मीटर उंच भिंत बांधत आहे.

अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सर्व सैनिक माघारी फिरले !

अमेरिकेने दिलेला शब्द पाळत ३१ ऑगस्टला अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तान सोडले. त्यामुळे आता अफगाणिस्तान पूर्णपणे (पंजशीर प्रांत वगळता) तालिबानच्या कह्यात गेला आहे.