‘अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवल्यामुळे लक्षावधी अफगाणी नागरिक पलायन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानचे शेजारील देश चिंतीत झाले आहेत. हे अफगाणी नागरिक विशेषतः ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इराण, तुर्कस्तान आणि पाकिस्तान या देशांत आश्रय घेण्यासाठी जात आहेत. हे अफगाणी नागरिक इराणमार्गे तुर्कस्तानात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी तुर्कस्तान इराणच्या सीमेवर २९५ किलोमीटर लांब आणि ३ मीटर उंच भिंत बांधत आहे. आता केवळ ५ किलोमीटरचे काम शेष राहिले आहे.’