हिंदु महिलांविषयी अश्‍लाघ्य टिपणी असलेल्या कादंबरीला केरळ साहित्य अकादमीचा सर्वश्रेष्ठ कादंबरीचा पुरस्कार !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. साम्यवादी आघाडी सरकार सत्तेत असलेल्या केरळमधील साहित्य अकादमीकडून याहून वेगळी अपेक्षा तरी काय करणार ? हिंदूंनी याविरोधात संघटित होणे आवश्यक आहे.

ओटीटी अ‍ॅप्सवर नियंत्रण ठेवण्याचा सरकार विचार करत आहे !

ओटीटी अ‍ॅप्सवरील वेब सिरीजद्वारे हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष, भारतीय वायूदल आदींचा अवमान करण्यात येत असून हा प्रकार गेले अनेक मास चालू आहे. अनेक संघटना याचा विरोध करत असतांना सरकार अजून विचारच करत आहे, हे राष्ट्रप्रेमी आणि हिंदु धर्मप्रेमी यांना अपेक्षित नाही !

तुम्ही अब्जावधी डॉलरचे आस्थापन असाल; मात्र लोकांचे खासगी आयुष्य पैशांपेक्षा अधिक महत्त्वाचे !

वापरकर्त्यांच्या माहितीचा व्हॉट्सअ‍ॅप कुठेही वापर करू शकते, हे धोरण ८ फेब्रुवारी २०२१ पासून लागू होणार होते; मात्र प्रचंड विरोध झाल्यानंतर हा कालावधी वाढवून १५ मे करण्यात आला आहे.

माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन !

माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचे १५ फेब्रुवारी या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या पुण्यातील रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. १६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

आंदोलन करण्याचा अधिकार म्हणजे वाटेल तेथे, वाटेल तेव्हा धरणे देता येत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

‘कुठेही निदर्शने करता येतात; मात्र प्रदीर्घ काळासाठी कोणत्याही प्रकारच्या आंदोलनांसाठी सार्वजनिक स्थळी दीर्घकाळ ठिय्या देता येत नाही. विशेषकरून इतरांच्या हक्कांवर प्रतिकूल परिणाम होत असेल, अशा जागी.’

सज्ञानी तरुण आणि तरुणी सहमतीने विवाह करत असतील, तर पोलीस त्यांची चौकशी करू शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

सज्ञानी असतांनाही फूस लावून जर कुणी बलपूर्वक विवाह करण्यासाठी दबाव टाकत असेल किंवा विवाह करत असेल, तर अशांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असा आदेशही न्यायालयाने द्यावा, असे जनतेला वाटते !

कोरोना महामारीच्या संकटामुळे केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिराकडून सरकारला ११ कोटी ७० लाख रुपये देण्यास असमर्थता !

संपूर्ण देशातील सहस्रो मंदिरांचे सरकारीकरण होऊन मंदिरांचा पैसा सरकारी योजनांसाठी खर्च केला जात असतांना जर सरकारचा थोडासा पैसा हिंदूंच्या मंदिरांवर खर्च झाला, तर तो हिंदूंनी सरकारला का परत करावा, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उत्पन्न होतो !

रेल्वेगाडीतून सामान चोरीला गेले, तर हानीभरपाई द्यावीच लागेल ! – सर्वोच्च न्यायालयाचा रेल्वेला आदेश

हे न्यायालयाला सांगावे का लागते ? रेल्वे प्रशासनाच्या हे लक्षात येत नाही का ?

केंद्र सरकार आणि ट्विटर यांनी खोट्या बातम्या आणि भडकाऊ पोस्ट यांवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा बनवावी ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना ट्विटर आणि केंद्र सरकार यांना एक यंत्रणा बनवण्यास सांगितले असून त्याद्वारे खोट्या बातम्या (फेक न्यूज) आणि भडकाऊ पोस्ट यांना आळा घालता येईल.

जमावाने उद्ध्वस्त केलेले मंदिर पाक सरकारने बांधावे ! – पाकच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील करक जिल्ह्यातील तेरी गावामध्ये ३० डिसेंबर या दिवशी हिंदूंच्या एका मंदिराची धर्मांधांच्या जमावाने तोडफोड करत आग लावली होती. पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने याची नोंद घेत सुनावणी करत मंदिराचे बांधकाम पुन्हा करण्याचा आदेश पाक सरकारला दिला आहे.