श्रीलंकेमधील लोक अन्नधान्यासाठी विकत आहेत दागिने !  

सौजन्य -ANI

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेतील स्थिती अत्यंत भयावह असून तेथील लोकांवर अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी घरातील दागिने विकण्याची वेळ आली आहे.

१. कोलंबोतील सर्वांत मोठी सराफा बाजारपेठ ‘कोलंबो गोल्ड सेंटर’ येथील अनेक व्यापार्‍यांनी सांगितले की, लोकांना दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी दागिने विकणे भाग पडले आहे.

२. उद्योगपती सिल्वा यांच्या म्हणण्यानुसार श्रीलंकेत असे संकट याआधी आम्ही पाहिले नव्हते. श्रीलंकेच्या चलनाच्या मूल्यात झालेल्या ऐतिहासिक घसरणीनंतर दागिने खरेदी करणार्‍यांची संख्या अत्यंत अल्प आणि ते विकणारे अधिक झाले आहेत.