नवी देहली – मोठ्या आर्थिक संकटाशी सामना करत असलेल्या श्रीलंकेला भारत सातत्याने साहाय्य पुरवत आहे. भारताने श्रीलंकेला इंधनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेल यांचा पुरवठा केला. भारताने श्रीलंकेला ३६ सहस्र मेट्रिक टन पेट्रोल आणि ४० सहस्र मेट्रिक टन डिझेल पोचवले. यापूर्वी २.७ लाख मेट्रिक टन इंधनाचा साठा श्रीलंकेला देण्यात आला होता.
वर्ष १९४८ नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात ढासळत असलेल्या श्रीलंकन अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी भारताने १ बिलियन अमेरिकी डॉलरचे (७ सहस्र ६०० कोटी रुपयांहून अधिकचे) कर्ज देण्याची घोषणा केली आहे.