(म्हणे) ‘२ मिनिटांच्या अजानसाठी मशिदींवरील ध्वनीक्षेपकाचा वाद उकरणे निरर्थक !’ – महंमद हाफीझुर रहेमान, अध्यक्ष, जामा मशीद

सर्वाेच्च न्यायालयाने मशिदींवरील भोंगे हटवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे मोहम्मद हाफीझुर रहेमान न्यायालयापेक्षा आपण अधिक शहाणे असल्याचेच दाखवून स्वतःचेच अज्ञान पाजळत आहेत !

(म्हणे) ‘गणेशोत्सवातील ‘डीजे’मुळे ध्वनीप्रदूषण होत नाही का ?’ – आमदार अबू आझमी

मशिदींवरील भोंगे काढण्याचा सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश असतांना ते अद्याप का काढले गेले नाहीत ? त्यासाठी आझमी यांनी आजपर्यंत काय प्रयत्न केले ? या प्रश्नांची उत्तरे ते देतील का ?

भोंग्यांचा धर्म आणि ‘राज’ कारण !

३ राज्यांत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा होणे, कर्नाटकात धर्मांतरविरोधी कायदा, तसेच मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होणे, काश्मिरींवरील अन्यायाला अमेरिकेतील मानवाधिकार संघटनेने वंशविच्छेद घोषित करणे, हलालविरोधात जागृती होणे आणि परत अवैध भोंग्यांचा विषय वर येणे, हे कालसुसंगत घडत आहे. हिंदूंनी मात्र आता धर्माच्या बाजूने रहायचे कि अधर्माच्या याचा निर्णय वेळोवेळी घ्यायचा आहे !

मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत, तर आम्ही ध्वनीक्षेपकावर भजने लावू !

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई न करणार्‍या पोलिसांनी या प्रकरणात श्री. मुतालिक यांना तत्परतेने नोटीस पाठवतील, हे लक्षात घ्या !

मशिदींवर भोंगे लावले, तर मंदिरावर दुप्पट आवाजात ‘हनुमान चालीसा’ लावा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

कोणत्या धर्मात लिहिले आहे की, मशिदींवर भोंगे लावा ? जेव्हा धर्म लिहिला गेला, तेव्हा भोंगे होते का ? युरोपमध्ये ध्वनीवर्धक कुठे आहेत ? तुमच्या परमेश्वराला प्रार्थना करा; पण घरात राहून. प्रत्येकाने धर्म घरात ठेवला पाहिजे.

शिवोली येथील वसंत विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून नाईट क्लब आणि उपाहारगृहे यांतील संगीतामुळे ध्वनीप्रदूषण होत असल्याची प्रदूषण मंडळाकडे तक्रार

रात्रभर मोठ्या आवाजात चालू असलेले संगीत प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा स्थानिक प्रशासन यांना कसे ऐकू येत नाही  ?  त्यांना बहिरे म्हणायचे का ?

निवडणूक आचारसंहिता आणि कोरोनाविषयक निर्बंध डावलून मोरजी येथे संगीत रजनीचे आयोजन

निद्रिस्त गोवा पोलीस आणि प्रशासन ! कोरोनाविषयक आणि निवडणूक आचारसंहिता यांच्याविषयीचे नियम न पाळता शेकडो पर्यटक संगीताच्या तालावर नाचत असल्याचे दिसून आले. पोलीस आल्याचे कळताच आयोजकांनी वीजपुरवठा बंद केला.

गोव्यात रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीक्षेपक लावण्यावरील बंदीआदेशाचे कठोरतेने पालन करण्याचे उच्च न्यायालयाचे प्रशासन आणि पोलीस यांना निर्देश

असे न्यायालयाने सांगावे लागणे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! बंदीआदेश असतांना ध्वनीक्षेपक लावले जात असल्याचे पोलिसांच्या का लक्षात येत नाही ?

इंडोनेशियातील मशिदींवरील भोंग्यांचा आवाज नियंत्रित केला जाणार !

जे जगातील सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेल्या इस्लामी इंडोनेशियाला शक्य आहे, ते धर्मनिरपेक्षतावादी भारताला का शक्य होत नाही ?