५ मे या दिवशी उंच लाटा येण्याची शक्यता

मुंबई – भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हिस यांनी ४ मे या दिवशी सकाळी ११.३० वाजल्यापासून ते ५ मे या दिवशी रात्री ११.३० वाजेपर्यंत ३६ तासांच्या कालावधीत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

भरतीच्या कालावधीत समुद्राच्या लाटांच्या उंचीत सरासरी ०.५ मीटर ते १.५ मीटर इतकी वाढ होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक यांच्या साहाय्याने नागरिकांना समुद्रात जाण्यापासून बंदी करण्याचे निर्देश दिले आणि मच्छीमार बांधवांना या कालावधीत किनार्‍यावर सुरक्षित अंतरावर बोटी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.