‘कोल्हापूर वॉकर्स कोल्हापूर’च्या वतीने मतदान जागृती फेरी !

कोल्हापूर वॉकर्स कोल्हापूर’च्या वतीने काढण्यात आलेली मतदान जागृती फेरी

कोल्हापूर – लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक नागरिकांनी मतदान करण्यासाठी ‘कोल्हापूर वॉकर्स कोल्हापूर’च्या वतीने मतदान जागृती फेरी काढण्यात आली. यात रंकाळा तलाव परिसरात आलेल्या नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष धोंडीराम चोपडे, उपाध्यक्ष परशुराम नांदवडेकर, महिपती संकपाळ, नाना गवळी, उदय गायकवाड, राजेश पाटील यांसह अन्य उपस्थित होते.