पावसाने १०० वर्षांचा विक्रम मोडला !
रियाध (सौदी अरेबिया) – हवामान पालटांमुळे वाळवंटाचा देश म्हणून समजल्या जाणार्या सौदी अरेबियात सर्वत्र पुरामुळे हाहा:कार माजला आहे. सौदी अरेबियात गेले ७ दिवस सतत पाऊस कोसळत असल्याने येथील नद्यांना पूर आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या १०० वर्षांचा पावसाचा विक्रम मोडीत निघाला आहे, असेही बोलले जात आहे. मुसलमानांसाठी पवित्र असलेल्या मक्का आणि मदिना या शहरांतही पूर आला आहे. विविध शहरांतील रस्त्यांनीही नद्यांचे रूप घेतले. आता संयुक्त अरब अमिरातीतही वादळी पाऊस पडू शकतो, असे सांगितले जात आहे.
सौदी अरेबियातील शहरांत पूर आल्याने लोक घराबाहेर पडू शकले नाहीत. लोकांनी सांगितले की, पुरात मेंढ्या वाहून गेल्याचे चित्रही समोर आले आहे.