पनवेल ते मडगाव आणि सावंतवाडी विशेष रेल्वेगाड्या धावणार !

रत्नागिरी – उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.

गाडी क्रमांक ०११५८ मडगाव ते पनवेल विशेष रेल्वेगाडी ६ मे या दिवशी सकाळी ६ वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी पनवेल येथे सायंकाळी ६.५० वाजता पोचेल. गाडी क्रमांक ०११५७ पनवेल- मडगाव विशेष रेल्वेगाडी पनवेल येथून ८ मे या दिवशी पहाटे ४ वाजता निघेल. ही गाडी त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मडगाव येथे पोचेल. या गाडीला करमळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा येथे थांबा आहे. या रेल्वेगाडीला २० एल.एच्.बी. डबे असून त्यातील १० शयनयान, ८ सामान्य आणि २ एस्.एल.आर्. डबे असतील.

गाडी क्रमांक ०११५९ पनवेल-सावंतवाडी रोड विशेष रेल्वेगाडी ६ मे या दिवशी रात्री ८ वाजता पनवेल येथून निघेल. दुसर्‍या दिवशी ती गाडी सावंतवाडी रोडला सकाळी ६ वाजता पोचेल. गाडी क्रमांक ०११६० सावंतवाडी रोड-पनवेल विशेष गाडी ७ मे या दिवशी दुपारी ४ वाजता सावंतवाडी रोडवरून निघेल. ही गाडी रात्री ३ वाजता पनवेलला पोचेल. या रेल्वेगाडीला रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबा असेल. या गाडीला २० एल.एच्.बी. डबे असून यामधील १० शयनयान, ८ सामान्य आणि २  एस्.एल.आर्. डबे असतील, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.