सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ९१ नवीन रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे ९१ नवीन रुग्ण आढळले, तर मृत्यू झाल्याची नोंद नाही. मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ सहस्र ४६५ झाली आहे.

साथीच्या रोगांकडे प्रशासन कोरोनाच्या दृष्टीकोनातून बघत असल्याने जनता भयभीत ! – प्रसाद गावडे, कुडाळ तालुकाध्यक्ष, मनसे

जनतेला भयभीत करून सोडण्यापेक्षा ग्रामीण रुग्णालये, आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यांच्या माध्यमातून तात्काळ साथीच्या आजारांवर उपयोगी औषधोपचार चालू करावेत.

विद्यापिठांच्या स्वायतत्तेवर नियंत्रण आणण्याचा महाराष्ट्र शासनाचा डाव ! – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग

प्रभारी कुलपती पदावर राजकीय व्यक्ती नियुक्त करून शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप साधण्याचा डाव राज्य सरकार करत आहे, असा आरोप करत अशा प्रकारचे विधेयक तात्काळ रहित करण्यात यावे अन्यथा विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल !

विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या माध्यमातून केले जाईल ! – के.मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

विजयदुर्ग किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि परंपरा येथे येणार्‍या प्रत्येक पर्यटकाला कळण्यासाठी निश्‍चितपणे या किल्ल्याचे संवर्धन केले जाईल.

विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी हिंदु जनजागृती समिती, विजयदुर्ग ग्रामविकास समिती आणि पुरातत्व खात्याचे अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करणार ! – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी

जिल्हाधिकाऱ्यांनी विजयदुर्ग किल्ल्याची पहाणी केली त्यावेळी झालेल्या चर्चेचा वृत्तांत ….

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोन ४१ नवीन रुग्ण

सद्य:स्थितीत १३४ रुग्णांवर उपचार चालू आहेत. ५ जानेवारी २०२२ या दिवशी कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ५१ सहस्र ७६२ झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी १६ जानेवारी २०२२ पर्यंत विविध निर्बंध

जिल्ह्यात झालेल्या निवडणुका आणि मतमोजणी तसेच एस्.टी.च्या कर्मचार्‍यांचा चालू असलेला संप या पार्श्‍वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत.

थकबाकी असलेल्यांच्या हाती सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सूत्रे गेल्याचे दु:ख ! – सतीश सावंत, शिवसेना नेते

पराभवावर बोलतांना सावंत म्हणाले, ‘‘या निवडणुकीत धनशक्ती आणि बळ यांचा वापर केला गेला. संतोष परब यांच्यावर आक्रमण करून ‘आमच्यासोबत राहिला नाहीत, तर तुमचाही संतोष परब होईल’, अशी भीती मतदारांमध्ये निर्माण केली गेली.

मालवण येथे मासेमारी कायद्यातील जाचक अटींच्या विरोधात पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करणार्‍या मासेमारांचे साखळी उपोषण चालू

सिंधुदुर्ग जिल्हा आधुनिक यांत्रिक रापणकार (पर्ससीन) असोशिएशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे.

ओरोस येथे पेट्रोलपंप लुटून पसार झालेल्या घाटकोपर (मुंबई) येथील ५ जणांना पकडण्यात पोलिसांना यश

सिद्धी पेट्रोलपंपावर चोरी करून पळणार्‍या ५ जणांना करूळ तपासणी नाक्यावर पोलिसांनी कह्यात घेतले. त्यांच्याकडे ५७ सहस्र रुपये रोख रक्कम आणि ३० भ्रमणभाष संच पोलिसांना सापडले.