संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्याकडे कोट्यवधी रुपये कुठून आले ? याचे अन्वेषण व्हायला हवे ! – किरीट सोमय्या, भाजप

अंमलबजावणी संचालनालयाने सौ. वर्षा राऊत यांना बँके’तील आर्थिक अपहाराप्रकरणी चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्यांनी हे वक्तव्य केले आहे.

नवी मुंबईत पंतप्रधान निवास योजनेला सर्व पक्षियांचा विरोध

सिडकोने पंतप्रधान आवास हा गृहप्रकल्प उभा करायला घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी शिवसेनेने दिली आहे.

सौ. वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात उपस्थित रहाण्याठी मुदतवाढ ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस दिल्यामुळे अनेक नेते भाजपमध्ये गेले आहेत; मात्र मी शिवसेनेमध्ये आहे, शिवसेनेतच राहीन आणि शिवसेनेतच मरीन.

काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली पोलिसांना दिसली नाही का ? – रविकिरण इंगवले, शहरप्रमुख, शिवसेना

पदवीधर निवडणुकीत झालेले मेळावे, तसेच रॅलीमध्ये ट्रॅक्टरवर दिमाखात बसलेली नेतेमंडळी पोलीस प्रशासनाला दिसली नाही. शिवाजी पेठेत फिरंगाई प्रभागात झालेला मेळावा मात्र पोलिसांना दिसला आणि त्यांनी माझ्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद केला.

राजकीय भडास काढण्यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचा वापर ! – खासदार संजय राऊत, शिवसेना नेते

‘‘कुटुंबियांना लक्ष्य करणे, ही नामर्दानगी आहे. या नामर्दानगीला शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल. बायकांच्या पदाराआडची खेळी तुमच्यावर उलटल्याविना रहाणार नाही. आमच्यापैकी कुणी काहीही चुकीचे केलेले नाही.

अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाराचा राजकारणासाठी उपयोग महाराष्ट्रात पाहिलेला नाही ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

भाजपच्या विरोधात बोलणार्‍यांच्या मागे अंमलबजावणी संचालनालयाची चौकशी लावली जाते.=अनिल देशमुख

मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असा फलक लावला

सौ. वर्षा राऊत यांना समन्स आल्यावर शिवसैनिकांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयावर ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असा फलक लावला.

खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स

४ वर्षांपूर्वी ‘पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र बँके’मध्ये ३५० कोटी रुपयांचा अपहार झाला होता. यामध्ये काही रक्कम सौ. वर्षा राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय यांच्या खात्यात जमा झाल्याविषयी चौकशी करण्यासाठी त्यांना समन्स पाठवण्यात आला आहे.

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाविषयी शिवसेनेने सल्ला देऊ नये ! – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व सोनिया गांधी यांनी करावे, हे एकमताने मान्य केलेले आहे.

अकलूज (जिल्हा सोलापूर) येथे पार पडली युवासेनेची आढावा बैठक 

युवासेना कोअर कमिटीत ‘गाव तिथे शाखा; बूथ तिथे युथ’ ही संकल्पना सांगितली.