शिर्डी येथील ग्रामस्थांचा बेमुदत बंदचा निर्णय मागे !

राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी (जिल्हा नगर) – येथील साई मंदिरात सुरक्षेसाठी सी.आय.एस्.एफ्.ची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. या सुरक्षेमुळे ग्रामस्थांना त्रास होऊ शकतो. त्यासाठी या सुरक्षेला तीव्र विरोध करत सर्वपक्षियांसह ग्रामस्थांनी १ मेपासून एल्गार पुकारत बेमुदत बंदची हाक दिली होती; मात्र राज्याचे महसूलमंत्री आणि नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह प्रशासन अन् ग्रामस्थ यांच्यातील बैठकीनंतर बेमुदत बंदचा निर्णय मागे घेण्यात आला.

राज्य सरकार न्यायालयात बाजू मांडणार असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली आहे. ग्रामस्थांच्या वतीने उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका प्रविष्ट करण्यात येईल. ग्रामसभेत ठराव घेऊन ग्रामस्थांच्या मागण्या उच्च न्यायालयापर्यंत पोचवण्यात येतील.